BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खास महिलांच्यासाठी सोनं खरेदी योजना सुरु Gold purchase scheme launched especially for women

 


शिराळा,ता.१७ : संस्थेचे २५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण झाल्याने रौप्य महोत्सवी वर्षा निमित्ताने खास महिलांच्यासाठी सोनं खरेदी योजना सुरु केली आहे.सभासदांना ९ टक्के लाभांश दिला जाईल असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक विजयसिंग खांडेकर यांनी केले.

शेडगेवाडी (ता.शिराळा) येथे जनउत्कर्ष ग्रा.बी.शेती सह.पतसंस्थेच्या २५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शांताराम जाधव होते. यावेळी खांडेकर म्हणाले,संस्थेचे एकूण सभासद १८६५ आहेत.संस्थेने आज पर्यंत कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही.अहवाल सालात झालेली उलाढाल ही स्वनिधिवर आहे.९२.३९ टक्के कर्ज वसुली झाली आहे.संस्थेला १०० पैकी ८०.५५ गुण प्राप्त झाले असून लेखा परीक्षणात " अ " वर्ग प्राप्त झाला आहे.

स्वागत व प्रास्ताविक किसन भाष्टे  यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष मारुती शिंदे,अशोक लोहार, टी.एच.आटूगडे, आर.डी.पाटील,अॅड नरेंद्र सूर्यवंशी,अरुण खांडेकर,सोनाबाई जाधव,सरपंच राहुल पाटील,लेखापाल अण्णासाहेब जाधव,मारुती पाटील,विश्वास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.शालेय स्पर्धेत यश मिळवलेल्या रिया खोत,ऋतुराज जंगम,शर्वरी बेंद्रे,स्वरा कदम,आराध्या जाधव,विश्वेश जाधव  तर स्पर्धा परीक्षेतून अन्न पुरवठा अधिकारी म्हणून निवड झालेल्या काजल पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू सावंत,संचालक जनार्धन कांबळे,आनंदराव जाधव,रघुनाथ धुमाळ,संजय गुरव,शिवाजीराव चौगुले,प्रदीप  गायकवाड,श्रीकृष्ण हारूगडे,अशोक काटकर,तानाजी शिंदे,सुनंदा मस्के,शोभा पाटील,सर्व सल्लागार,कर्मचारी व सभासद उपस्थित होते.आभार मुख्यव्यवस्थापिका अंजना खांडेकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments