प्रत्येक मतदार संघावर क्लिक करा आणि जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अपडेट
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
शिराळा,ता.२८:महायुतीचे सरकार आपणाला पुन्हा आणायचं असेल तर ती जबाबदारी लाडक्या बहिणीची आहे.माझ्या जोडीला आमदार म्हणून सत्यजित देशमुख यांना निवडून द्या.विकासाला चांगली गती मिळेल.या निवडणुकीत चिखलात कमळ फुलवण्यासाठी चिखलीतून सुरुवात करा असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.
शिराळा येथे भुईकोट किल्ल्यावर महायुतीचे भाजपाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आयोजित सभेत बोलत होते.
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले,सत्यजित देशमुख यांना या निवडणुकीत वाळवा तालुक्यातून दहा हजाराचे मताधिक्य देणार असून ते पंचवीस हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून येतील.सत्यजित तुम्ही आमदार झाल्यावर मला पाठींबा दिल्यावर मी मंत्री होईल.आपण दोघ विकासाचा पाऊस पाडू.ही निवडणूक विकासाची असल्याने देशमुख यांच्या विजयासाठी १५ दिवस पायाला भिंगरी बांधून मतदार संघ पिंजून काढा.
सत्यजित देशमुख म्हणाले,मी संघटनेवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे.मला कोणत्याही पदांची अपेक्षा नाही.अनेक वेळा झालेल्या पराभवाने मी कधी ही खचलो नाही.उलट सतत लोकांच्या कामाला प्राधान्य दिले.शिवाजीराव देशमुख साहेबांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी सतत काम करत गेलो.विधानसभा मतदार संघाला महाराष्ट्रातील टॉप टेन मधील मतदार संघ करायचा मानस आहे.
यावेळी सम्राट शिंदे,के.डी.पाटील,सी.बी.पाटील,अशोक पाटील,हणमंतराव पाटील,पृथ्विसिंग नाईक,रणजितसिंह नाईक,अनिता धस यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंबामाता मंदिरापासून,सोमवार पेठ,कुरणे गल्ली,गुरुवार पेठमार्गे एसटी बस स्थानक मार्गे भुईकोट किल्ल्यावर रॅली काढण्यात आली.
यावेळी संपतराव देशमुख,फतेसिगराव देशमुख,विकासराव देशमुख,सुजित देशमुख,रेणुकादेवी देशमुख,डॉ.शिल्पाताई देशमुख,विश्वप्रतापसिंग नाईक,सागर खोत,आनंदराव पाटील,चंद्रकांत पाटील,दि.बा.पाटील,अभिजित नाईक,जयराज पाटील,कुलदीप निकम,रुपाली भोसले उपस्थित होते.
बिटक वाट; जोडीला लवकरच येईल सम्राट.
सम्राट महाडिक यांना महायुतीकडून भाजपने उमेदवारी दिली नसल्याने ते नाराज आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगळ्या आहेत. त्यामुळे मतदार संघात वेगळी चर्चा आहे. तोच धागा पकडून थोडी कळ काढा. सध्या जरी बिटक असली वाट तरी जोडीला लवकरच येईल सम्राट असे म्हणून खासदार धैर्यशील माने यांनी सम्राट महाडिक यांची समजूत आम्ही काढून हा मार्ग सुखकर करू. चिंता करू नका असे सांगून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले.
सम्राट लहान भाऊ
सम्राट महाडिक हे माझे लहान भाऊ आहेत. त्यांचा फोटो आम्ही या व्यासपीठावर असणाऱ्या बॅनर वर सुद्धा ठेवला आहे. मला एकवेळ संधी द्या. सदाभाऊ तुमच्या मदतीने सम्राट व राहुल या दोघांना ही आपल्या सोबत घेवून सतेच्या अग्रभागी घेऊन जावू. परिवर्तनाची नांदी आहे. या परिवर्तनाच्या गाडीच्या चाकाला गुणा लागू नये याची काळजी घ्या. अशी भावनिक साद सत्यजित देशमुख यांनी महाडिक बंधूना घातली.
मुक्त मराठी लघुचित्रपट
-
व्रण मराठी लघुचित्रपट
टमरेल मराठी लघु चित्रपट
-
खराटा मराठी लघु चित्रपट
कहर मराठी लघुचित्रपट
0 Comments