बेरडेवाडी-गुढे (ता.शिराळा) येथील भैरवनाथ व आसुबाई देवीच्या यात्रे निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात पै.कुमार पाटील विरुद्ध पै.माऊली वाघमारे यांची प्रथम क्रमांकाची कुस्ती जोडताना ऑलिंपिकवीर बंडा पाटील रेठरेकर सोबत मुंबई कामगार केसरी पै.समींदर जाधव व इतर
शिराळा,ता.१४:बेरडेवाडी-गुढे (ता.शिराळा) येथील श्री भैरवनाथ व आसुबाई देवीच्या यात्रे निमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमाकांच्या कुमार पाटील विरुद्ध माऊली वाघमारे या लढतीत कुमार पाटील याने माऊली वाघमारे याच्यावार घिस्सा डावावर विजय मिळवला.
दोन नंबरची कुस्ती सूरज पाटील विरुद्ध शाहरुख पठाण यांच्या झाली. त्यामध्ये सूरज पाटीलने शाहरुख यास छड़ीटांग डावावर चिटपट केले.तीन नंबरच्या झालेल्या कुस्तीमध्ये सचिन महागावकरने भागवत मिरगुडे याच्यावर मच्छीकोटा डावावर विजय मिळवला.कुस्ती मैदानास यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक,शिराळा तालुका भाजपा अध्यक्ष हणमंतराव पाटील,भूषण नाईक,उद्योजक शंकरदादा मोहिते,ऑलिंपिकवीर बंडा पाटील रेठरेकर यांनी भेट दिली.
मैदानातील विजयी मल्ल असे ओमकार जाधव,शुभम शेणवी,ओम शेवाळे,सुशांत केसरे,शुभम पाटील,संदीप पाटील,पियूष शेवाळे,श्री चोरमारे,मेघराज माने,सुशांत पाटील,अमर पाटील,साहिल काळे,रणवीर जाधव,पार्थ निकम, शौर्यजीत साळुंखे. पंच म्हणून समींदर जाधव,राहूल पाटील,धनाजी जाधव,पोपट पाटील,शिवाजी पाटील यांनी काम पाहिले. सुरेश जाधव चिंचोलीकर,किसन भाष्टे यांनी निवेदक म्हणून काम केले.हलगी वादक म्हणून काम मारुती मोरे गारगोटीकर यांनी काम पाहिले.या कुस्ती मैदानात ५० हुन अधिक चटकदार कुस्त्या झाल्या.कुस्तीचे नियोजन श्री भैरवनाथ व आसुबाई यात्रा कमिटी बेरडेवाडी, गुढे, बांबरवाडी, ढाणकेवाडी, मणदुर धनगरवाडा,काळगाव धनगरवाडा,विठ्ठलवाडी आणि ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले होते.
0 Comments