BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

सौंदर्य उद्योगात कुशल व्यावसायिक बना Become a skilled professional in the beauty industry

 शिराळा,ता.१८:ब्युटी पार्लरच्या माध्यमातून सौंदर्य उद्योगात एक कुशल व्यावसायिक बनण्याची उत्तम संधी आहे.सौंदर्य उद्योगात सध्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशिक्षित आणि अनुभवी ब्युटीशियन्सना जास्त मागणी असल्याचे प्रतिपादन राहूल फाटे संशोधन कॉस्मेटिक्स नाशिकचे महाव्यवस्थापक विकास नेउलकर यांनी केले.

शिराळा येथील डालमिया कौशल्य प्रशिक्षण केंद्र अंतर्गत दिक्षा कौशल्य केंद्रात ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थीसाठी आयोजित  कार्यशाळेत बोलत होते.यावेळी विकास नेउलकर यांनी नैसर्गिक व रासायनिक उपचार पद्धती कशी असावी यावर मार्गदर्शन करून महिलांना प्रात्यक्षिक  करून दाखवले.यावेळी ते म्हणाले,ग्रामीण भागातील महिलांना कमी कालावधीत चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी बनण्याचा हा चांगला मार्ग आहे.त्यामुळे आपल्या कुटुंबाला चांगला अर्थिक आधार देणे शक्य होणार आहे.

स्वागत व प्रास्ताविक स्वाती शिंदे यांनी केले. राहूल फाटे संशोधन कॉस्मेटिक्स नाशिकचे टेक्निकल मॅनेजर साजिद मुजावर, चरण येथील मीनाक्षी ढवळे यांनी ब्युटीपार्लर कसे असावे याची माहिती दिली.यावेळी दिक्षा सेंटरचे मॅनेजर आनंद ढोणे,अक्षय भुगडे,अविनाश सर्वेगोड,अंकिता कांबळे,सुविद्या चरापले,गौरी गुरव,अलका सकटे,सुनिता पाटील, प्रशिक्षणार्थी  उपस्थित होते.आभार अंकिता कांबळे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments