BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पक्ष प्रवेशा नंतर अॅड. भगतसिंग नाईक यांचे भव्य रॅलीने शिराळ्यात स्वागत After party admission, Adv. Bhagat Singh Naik was welcomed in Shirala with a grand rally


रॅलीचा व्हिडीओ पहा 
ी 

शिराळा,ता.१३: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी पंचायत समिती सभापती अॅड. भगतसिंग नाईक यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांनी  मुंबई येथे  दसरा मेळाव्यात शिवसेना  एकनाथ शिंदे गटात  विश्वप्रतापसिंह व पृथ्वीसिंह नाईक या दोन मुलांच्या सह कार्यकर्त्यांच्या समवेत पक्ष प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार धैर्यशील माने यांची प्रमुख उपस्थिती होती.  

आज सायंकाळी पेठ नाका ते शिराळा अशी भव्य रॅली काढून अंबामाता मंदिर येथे सभा झाली. यावेळी भगतसिंग नाईक म्हणाले,मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळचा पहिला शिराळा  तालुकाध्यक्ष होतो. त्या माध्यमातून  घराघरात पक्ष पोहोचवण्याचे काम केले.असे असताना आम्ही पक्षातून कसे बाहेर पडू याचेच जास्त प्रयत्न झालेत. माझ नुकसान केल आता माझ्या मुलाचं राजकीय नुकसान  मी  का सहन करू.म्हणून हा निर्णय घेणे भाग पडले.

 सत्यजित देशमुख म्हणाले,मुंबईला घड्याळ गावात तुतारी ही दुटप्पी भूमिका विद्यमान आमदारांची कशासाठी आहे हे ओळखा.त्यामुळे आपली ही लढाई संधीसाधू,दडपशाही,अहंकार, यांच्या विरोधात आहे.कार्यकर्त्यांचा अवमान आम्ही कधी खपवून घेणार नाही.

सम्राट महाडिक म्हणाले,आता नाईक कुटुंबीयांनी घेतलेला  निर्णय योग्य आहे.राजकरणा बरोबर कारखान्याकडे आपले लक्ष केंद्रित करा.लोकसभेला भगतसिंग नाईक यांच्या प्रचाराचा करिष्मा आम्ही शिराळ्यात पाहिला आहे. उमेदवारी कोणाला ही मिळो. शिराळा मतदार संघात आपल्या विचाराचा  झेंडा फडकवून विद्यमान आमदारांचा पडावं करू.आपल्यात फुटीचा प्रयत्न केला जाईल.त्याला बळी पडू नका.

पृथ्वीसिंह नाईक म्हणाले,आमच्या घराण्यावर नेहमीच अन्याय केला.शिराळा नगरपंचायतचे नगराध्यक्षपद  खुले झाले असताना चिखलीतील  नावे शिराळच्या मतदार यादी आली. हे कशासाठी? त्यामुळे आम्ही बदलाचा निर्धार केला आहे.आमच्या निर्णयाबद्दल आमच्या पाठीशी ठाम रहा..युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी आम्ही ठाम राहू.

यावेळी रणजितसिंह नाईक,नम्रता नाईक ,दुर्गा पाटील,कश्मिरा नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी विश्वप्रतापसिंह नाईक,माजी जिल्हापरिषद सदस्य संपतराव देशमुख, के.डी.पाटील,भाजप तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील,संजय गांघी निराधार योजनेचे अध्यक्ष केदार नलवडे,दीपक गायकवाड,विक्रम पाटील, उपस्थिती होते.

चर्चा-दाढी,बिन दाढीची 

अॅड.भगसिंग नाईक यांनी विधानसभेला उमेदवारी जाहीर केली त्यावेळी माझ्या पोटात गोळा आला.पण खरं सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार धैर्यशील माने,भगतसिंग नाईक हे दाढीवाले आहेत.दाढीला चांगले दिवस आहेत.मी ही दाढीवला आहे.लहान भाऊ म्हणून मला आमदारकीला मदत करा असे मिश्किल वक्तव्य सम्राट महाडिक यांनी केले तर प्रत्येक ठिकाणी दाढीवाला पाहिजेच असे नाही.बिन दाढीचे असणारे आमचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसते इतिहास घडवतात.त्यांना दाढी नसली तरी बिन दाढीचा त्याचा करिष्मा सर्वांनी पाहिला आहे. आता मला मदत करा असे सत्यजित देशमुख म्हणताच सर्वत्र हश्या पिकला.

Post a Comment

0 Comments