BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पायी दिंडीचे ११ वे वर्ष 11th year of Pai Dindi

 


शिराळा,ता.३१:अभुतपूर्व श्री तुकाराम महाराज सेवा समिती संस्था, खोतवाडी (सोनवडे) यांच्यावतीने शनिवारी (ता.२) पासून खोतवाडी ते पंढरपूर या कार्तिक वारीसाठी  वारणा खोरा पायी दिंडी सोहळ्याचे १२ दिवसाचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष दीपक राणे यांनी दिली.

यावेळी राणे म्हणाले,पंढरपूर कडे जाण्यासाठी पायी दिंडीचे ११ वे वर्ष आहे. हि दिंडी खोतवाडी येथून शनिवारी (ता.२ )सायंकाळी चार वाजता प्रस्थान होऊन मुक्काम सोनवडे येथे होणार आहे.१३  नोव्हेंबर रोजी बुधवारी तुळशी विवाह दिवशी पंढरपूर येथे दिंडीची सांगता होणार आहे.दरम्यान सोनवडे, गवळेवाडी,ओंड,करवडी,म्हसुरणे,तरसवाडी,दिघंची,महूद बुद्रुक,पंढरपूर  या ठिकाणी मुक्काम होणार आहे.विणेकरी म्हणून  विराज धामणकर भाष्टेवाडी, तुळस सिध्दी  सावंत सावंतवाडी ही घेणार आहे. मृदुगमणी विराज राणे, सोहम खोत,लक्ष्मण महाराज, शंकर महाराज,चोपदार रामचंद्र सावंत, सखाराम दळवी, शिवाजी पाटील, रामचंद्र गायकवाड हे काम पाहणार आहेत. काशिनाथ महाराज गायकवाड,  शंकर महाराज येसले, मोहन दगडू बोराडे (तुळजापूर), राजवीर येसले,  किसन खोत, ज्ञानदेव भाष्टे, गेंदाबाई मोहन बोराडे (तुळजापूर), वंदना खोत, उर्मिला खोत, सुनंदा राणे,  विमल टाणे ह्या भजनसाथ  देणार आहेत. प्रत्येक मुक्कामी एक तास किर्तन सेवा होणार आहे.स्वयंसेवक म्हणून  बाबुराव धामणकर, महादेव येसले,प्रकाश राणे, आनंदा नेर्लेकर, सुनिल कदम,  संपत डवरी, अक्षय वनारे हे पाहणार आहेत. 


Post a Comment

0 Comments