प्रत्येक मतदार संघावर क्लिक करा आणि जाणून घ्या सांगली जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अपडेट
सांगली जिल्हा विधानसभा निवडणूक २०२४ | |||
---|---|---|---|
सांगली | मिरज | तासगाव-कवठेमहांकाळ | खानापूर |
शिराळा | इस्लामपूर | जत | पलूस-कडेगाव |
शिराळा,ता.२७:राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळवलेल्या उदगिरी येथील अपेक्षा पाटीलची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अपेक्षा ही आरळा येथील गांधी सेवाधाम माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थीनी आहे.तीने राष्ट्रीय शासकीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले आहे.अपेक्षा ११ वी मध्ये शिकत असून वयाच्या १२ व्या वर्षापासून कुस्तीचे धडे गिरवित आहे.बालवयात शालेयदशेतच अपेक्षाच्या मनात आत्मविश्वास व खेळाची गोडी वाढवण्याचे काम क्रीडाशिक्षक सुधीर बंडगर यांनी केले.घरामध्ये कुस्तीचा वारसा नसतानाही तीचे वडील विठ्ठल पाटील यांनी तीला कुस्ती खेळात घातले. सुरुवातीस कोकरूड या ठिकाणी वस्ताद वसंत मोहिते यांच्याकडे सराव करत तीने कुस्तीचा श्री गणेशा केला. सध्या मुरगुड येथील मंडलिक कुस्ती केंद्राचे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक दादासो लवटे यांच्याकडे ती तंत्रशुद्ध शिक्षण घेत आहे.पहाटे पाच वाजता तीचा सराव सुरु होतो. त्यांच्या मध्ये धावणे,बैठका , जोर,सपाट्य,जिमचा व्यायाम व कौशल्य सराव याचा समावेश आहे.सकाळी ४ व सांयकाळी ४ तास असा गेली ४ वर्षापासून अखंड न चुकता दररोज तीचा सराव सुरु आहे. दुध,थंडाई , अंडी,कडधान्ये,तुप,सुका मेवा,फळे असा तीचा उच्च प्रतिचा आहार आहे. सरावातील सातत्य,योग्य आहार व प्रचंड व्यायाम या त्रीसुत्रीमुळेच अल्पकाळातच तीने राष्ट्रीय स्पर्धेमध्ये यशस्वी मजल मारली आहे.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पाथर्डी (जि. अहिल्यानगर) येथे राज्यस्तरीय स्पर्धा संपन्न झाल्या.१९ वर्ष वयोगटातील ६२ किलो गटात तीने प्रथम क्रमांक मिळविला. तीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली . मेरठ ( उत्तरप्रदेश ) येथे राष्ट्रीय स्पर्धा संपन्न झाल्या त्यात प्रथम क्रमांक मिळविला.आंध्रप्रदेश,मध्यप्रदेश येथील खेळाडूंना चितपट तर गुजरात,राजस्थान,हरियाणा येथील खेळाडूंना १० - ०० अशा गुणांच्या फरकाने हरवत एकतर्फी विजय मिळवत राज्याला तीने सुवर्णपदक मिळवून दिले.भारतीय खेल प्राधिकरण व भारतीय खेल महासंघ केंद्र शासनामार्फत होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीची महाराष्ट्रातून निवड झाली आहे.
0 Comments