BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८ भरारी तर ७ स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती Appointment of 8 Bharari and 7 permanent survey teams in the wake of the election

 


शिराळा,ता.१७ :शिराळा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. मतदारसंघात ८ ठिकाणी भरारी तर ७ ठिकाणी स्थिर सर्वेक्षण  पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी पुनर्वसन तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ पोटे यांनी दिली.तहसीलदार कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते.

   यावेळी बोलताना सह्यायक निवडणूक निर्णय अधिकारी शामल खोत पाटील म्हणाल्या' शिराळा विधानसभा मतदारसंघात ३३४ ठिकाणी मतदान केंद्र असून निवडणुक कामासाठी २५८२  कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीचे कामकाज सुरळीत पार पाडण्याच्यासाठी  शिराळा,कोकरूड  येथे प्रत्येकी २ तर कासेगाव,इस्लामपूर, कुरळप व आष्टा येथे प्रत्येकी १ अशा एकूण ८ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.मांगले,कणेगाव,शेडगेवाडी फाटा,मालखेड फाटा, कोकरूड,सागाव,पेठनाका या सात ठिकाणी स्थिर सर्वेक्षण  पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.तहसीलदार कार्यालय येथे मतदार सह्यायता कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला असून सदर कक्षामार्फत मतदार नाव शोधून देणेचे कामकाज करण्यात  येणार आहे. ईव्हिएम, साहित्य, पोस्टल मतपत्रिका, वाहतूक व्यवस्था,मतदान व मतमोजणी कामी महिला कर्मचारी ७३० व पुरुष १८५२ अशा एकूण २५८२ कर्मचाऱ्यांची कार्यरत आहेत.पंचायत समिती शिराळा येथे आचार संहिता कक्ष स्थापन केला असून त्याचे प्रमुख गटविकास अधिकारी प्रकाश पोळ आहेत. या ठिकाणी एक खिडकी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.याठिकाणी सर्व प्रकारच्या परवानग्या दिल्या जाणार आहेत.आदर्श आचारसंहिता सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने सर्व शासकीय कार्यालय प्रमुख, विविध राजकीय पक्षाचे अध्यक्ष,प्रतिनिधी, बँकेचे शाखाधिकारी,मंडळ अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक,पोलिस पाटील यांची बैठक घेण्यात  आली . या  विधानसभा मतदार संघातील राजकीय पक्षाचे डिजीटल,बॅनर, होर्डीग,काढून घेणेचे व कमानी, जाहिराती फलक झाकून घेणेबाबत सर्वाना सूचना देण्यात आल्या आहेत. 

यावेळी  सहा.निवडणूक निर्णय अधिकारी, वैष्णवी मंदारे,  गटविकास अधिकारी तथा सहा.निवडणूक निर्णय अधिकारीप्रकाश पोळ, नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, हसन मुलाणी, राजाराम शिद,सोमनाथ वाजंळे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी नितीन गाढवे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments