शिराळा,ता,९: शिराळा बाह्यवळण रत्यावर ट्रक व मोटरसायकलच्या अपघातात प्रथमेश चंद्रकांत साळुंखे (वय २४) रा निगडी (.ता शिराळा ) हा युवक जागीच ठार झाला.याबाबत प्रविण विठ्ठल कडवेकर (रा. इंगरूळ ) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दिली आहे. हि घटना काल रविवारी ८आॉगस्ट रोजी रात्री नऊ च्या सुमारास घडली. अपघात झाल्या नंतर चालक पसार झाल्याने अज्ञात चालका विरुद्ध शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शिराळा पोलीसानी दिलेली माहिती अशी काल रविवारी मालवाहतूक ट्रक शिराळा बाह्यवळण रस्त्यावरून कोकरूडकडून शिराळ्याकडे येत होता .प्रथमेश साळुंखे मोटरसायकलवरून वरून शिराळ्याकडून कापरी कडे निघाला होता.यावेळी बाह्यवळण रस्त्यावरील कापरी फाट्याजवळ मोटरसायकलला ट्रकने धडक दिली. त्यामध्ये मोटरसायकलस्वार प्रथमेश हा जागीच ठार झाला. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला आहे.त्याचा शिराळा पोलीस शोध घेत आहेत. या पुढील तपास पोलीस हवालदार आर आर.शेख करत आहेत. त्याच्या मागे आई,दोन बहिणी ,भाऊ असा परिवार आहे. काल रात्री उशिरा त्याच्यावर निगडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments