शिराळा,ता.१८: ‘विश्वास’ कारखान्याच्या माध्यमातून कार्यक्षेत्रातील शेतकरी व कामगारांना न्याय देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे,असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष,आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सह. साखर कारखान्यामार्फत गणेशोत्सवात कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्षस्थावरून बोलत होते. आपला बझार समूहाच्या अध्यक्ष सौ. सुनीता नाईक, कार्यकारी संचालक अमोल पाटील प्रमुख उपस्थित होत्या.
बक्षीस वितरण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, सौ. सुनीता नाईक व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी रंजनाताई नाईक, मनीषा नाईक, माजी जि. प. सदस्य अश्विनी नाईक, ॲड. शुभलक्ष्मी नाईक, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष साधना पाटील, सखी मंचच्या अध्यक्ष वैशाली कदम, अर्चना कदम, शुभांगी देसाई, कल्पना गायकवाड, स्मिता महिंद, नूतन साठे, वैशाली भुयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम क्रमांक : स्टेनलेस स्टील डिनर सेटचे विजेते मानसिंग पाटील (रेड), द्वितीय क्रमांक : मिक्सरचे विजेते सुभाष गुरव (कणदूर), तृतीय क्रमांक : तांब्याचा १० लिटर पाण्याचा पिंप विजेते मनोज काटकर (शिराळा), चतुर्थ क्रमांक : सिसम लाकडाचा चौरंग विजेते शामराव जाधव (बिऊर), पाचवा क्रमांक : पितळेचे ताम्हन विजेते दत्तात्रय पाटील (मांगले). सर्व विजेत्यांना बक्षीसांसोबत स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ विजेते : गणपती काळे (शिराळे खुर्द), किरण पाटील (सागाव), संदीप पाटील, दिलीप पाटील व राजेंद्र कदम (दोघे मांगले), विजय देसाई (चिखली), दत्तात्रय पाटील (सरुड, ता. शाहूवाडी), संदीप सादळे (देववाडी), देवेंद्र पाटील (काळुंद्रे), पांडुरंग पाटील (बिळाशी). एकूण ४४ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. सर्वांना सहभागाबद्दल स्मृतीचिन्ह व प्रशस्तिपत्र देण्यात आले. सजावट परिक्षणाचे काम लीना कळंत्रे, प्रतिभा गायकवाड, मनिषा कुंभार, मयुर संकपाळ, श्रीधर यादव यांनी पाहिले.
0 Comments