शिराळा,ता.९ :तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत विश्वास विद्यानिकेतनच्या विध्यार्थ्यानी यश संपादन केले आहे. प्रथम क्रमांक आलेल्या खेळाडूंची जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१४वर्षे मुला मध्ये कार्तिक चव्हाण ३५ किलो गटात प्रथम तर वेदांत चव्हाण द्वितीय ,स्वस्तिक महांगडे-७५किलो गटात .प्रथम, शीवजीत साठे ४४ किलो गटात द्वितीय.१४ वर्षे मुलीमध्ये आरोही जाधव ४२किलो गटात .प्रथम, १७ वर्षे मुली मध्ये श्रेया बोर्गे ५४किलो गट प्रथम, श्रध्दा बेनचिनमर्डीमट ५७ किलो गट प्रथम. १९ वर्षे मुलीमध्ये वैष्णवी पवार ५९किलो गटात .प्रथम..१७वर्षे मुला मध्ये ग्रीकोरोमन प्रकारात जयदिप पाटील-४८ किलो गटात .प्रथम,केतन कांबळे ४५किलो गटात द्वितीय,अथर्व खरोसे ६५किलो गटात द्वितीय. १७वर्षेमुले फ्रि स्टाईल प्रकारात अथर्व पवार ८०किलो गटात प्रथम, वेदांत पाटील ६०किलो गटात प्रथम, रविराज सावंत ५५किलो गटात द्वितीय.१९वर्षे मुला मध्ये फ्रिस्टाईल प्रकारात केदार सावंत ६५किलो गटात प्रथम.
यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक ,रोहित नाईक ,भूषण नाईक, मुख्याध्यापक पी.आर.वरेकर,वसतिगृह अधिक्षक जोतिर्लिंग पाटील यांनी केले. खेळाडूना कुस्ती प्रशिक्षक सुनिल पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. क्रीडा शिक्षक ऊदय पाटील,बी.एन.पाटील,आदित्य पवार, अभिजीत कांबळे,गणेश पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.
0 Comments