BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

देव दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांवर साडे तीन तास ताटकळतं बसण्याची वेळ Three and a half hours sitting time for women going for God darshan

 


शिराळा,ता.१:शिराळा आगाराच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यातील समन्वयाच्या  आभावामुळे ११ मारुती दर्शनासाठी जाणाऱ्या पाच एस.टी बसच्या महिलांना सुमारे साडे तीन तास ताटकळतं बसण्याची वेळ आली.त्यामुळे एस.टी.व्यवस्थापनाच्या या नियोजनशून्य कारभाराबद्दल व पैसे देऊन विकतचा  त्रास मिळाल्या बद्दल महिलांनी संताप व्यक्त केला. त्या चालकांनी वाहक असल्याशिवाय जाणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने साडे नऊ वाजता दुसऱ्या चालकांची सोय करून बस मार्गस्त झाल्या.मात्र त्या नकार देणाऱ्या चालकांच्यावर कारवाईची बडगा उगारण्यात आला आहे . 

आज श्रावण महिन्यतील शेवटचा रविवार असल्याने ११ मारुती दर्शनासाठी शिराळा,अंत्री , मानकरवाडी, भाटशिरगाव, कार्वे येथील महिला जाणार होत्या .त्यासाठी  पाच एस.टी.चे बुकिंग केले होते. बुकिंग करत असताना  एस.टी सोबत वाहक मिळणार नाही. वाहक नसल्याने एस.टी मागे पुढे घेत असताना चालकाला माहिती देण्यासाठी तुम्ही तुमच्यातील एक पुरुष व्यक्ती घ्या म्हणून आगारा मार्फत सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक एस.टी.मध्ये एक पुरुष घेण्याचे नियोजन झाले होते. मात्र पुन्हा आम्ही चालक देतो.तुमचा सोबत पुरुष घेण्याची गरज नसल्याने एस.टी.प्रशासनाने सांगितले.काल  रविवारी सकाळी सहा वाजता तुम्हाला एस.टी.मिळले असे सांगितले. सकाळी सहा वाजता एस.टी.मार्गस्त होणार असल्याने महिलांनी पहाटे तीन पासून स्वयंपाक आवरून  शिराळा येथील महिला सहा वाजता शिराळा बस्थानक येथे आल्या.इतर गावातील महिला आपल्या गावात एस.टी.येणार म्हणून गावात बस थांब्यावर एकत्रित आल्या.मात्र सहा वाजता येणारी एस.टी.९ वाजल्या तरी आली नसल्याने महिला संताप्त झाल्या. सकाळी  चालक एस.टी घेऊन तयार होते.मात्र त्याच्या सोबत वाहक नसल्याने त्यांनी एस.टी.नेण्यासाठी नकार दिला. शिराळा येथील महिला सकाळी सहा वाजल्या पासून एस.टी.मध्ये साडे नऊ वाजे पर्यंत साडे तीन तास बसून होत्या.  

आम्हाला अर्थिक भुर्दंड बसतो. 

चालकांनी आमच्या सोबत वाहक असल्याशिवाय जाणार नाही असे एस.टी.व्यवस्थापनाला कालच सांगितले होते. मात्र आज जाताना वाहक नसल्याने चालकांनी जाण्यास नकार दिला.कारण चालक नसताना एस.टी.गर्दीतून पुढे मागे घेत असताना काही दुर्घटना घडली तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही चालकावर येऊन त्यास अर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.अशा घटना घडल्या आहेत. अशी भूमिका त्या पाच चालकांनी घेत  जाण्यास नकार दिला.

त्या चालकांना निलंबनाची नोटीस 

आज ११ मारुती दर्शनासाठी जाण्यास नकार देणाऱ्या त्या पाच पैकी चार चालकांना तुम्ही गंभीर गुन्हा केला असून चौकशीसाठी तुम्हाला आज पासून निलंबित करत असल्याचे पत्र आगार व्यवस्थापक यांनी दिले आहे. तर एकास लाईन ऑफ केले आहे. अशाच प्रकरणी परवा  शनिवारी आणखी एका चालकास  निलंबित केले आहे.  

आम्ही ११ मारुती दर्शनाचे बुकिंग करून गाड्यांची सोय केली.पण देवदर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना ताटकळत बसावे लागेल.त्यांची गैरसोय झाली ही आमची चुक आहे.

 धन्वंतरी ताटे (आगार व्यवस्थापक)

आम्हाला वेगळा नियम का ? 

११ मारुती दर्शनासाठी आज शिराळा येथे आलेल्या पलूस आगाराच्या एस.टी.साठी चालक वाहक दोघे होते. इतर आगारांच्या आलेल्या गाडीतचालक वाहक होते.मग  आम्हाला वेगळा नियम का असा  सवाल शिराळा आगारातील कर्मचारी करत होते.   

Post a Comment

0 Comments