या बाबत आपल्या असणाऱ्या प्रतिक्रिया प्रवाशांनी ९५५२५७१४९३ या व्हाटस अॅप वर पाठवाव्यात
शिराळा,ता.६ सप्टेंबर २०२४ :शिराळा येथील एस.टी आगाराच्या बसस्थानकात गेले अनेक महिने मोठे खड्डे पडले असून हा प्रवाशांचा खड्ड्यातून होणार प्रवास कधी थांबणार व खड्डे मुजावण्यासाठी मुहूर्त कधी मिळणार असा सवाल प्रवाशी वर्गातून होत आहे. प्रवाशांना आधी खड्ड्यातून मग एसटीतून प्रवास करावा लगत आहे.
पावसामुळे खड्यात पाणी साचून रहात असल्याने मोठ्या प्रमाणत चिखल झाला असल्याने प्रवाशांना बस्थानकातून एस.टी त एसटी पर्यंत जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वयोवृद्ध व दिव्यांग प्रवाशांचे त्यातून मार्ग काढताना हाल होत आहे.त्यामुळे हे खड्डे मुजवून घेवून या चिखलाच्या साम्राज्यातून प्रवाशी वर्गाची मुक्तता करावी अशी मागणी होत आहे.
शिराळा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने व एस.टी आगार असल्याने ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थिनींसह प्रवाशांना मोठी संख्या आहे.याच ठिकाणाहून तालुक्यातील ग्रामीण भागासह इस्लामपूर, बांबवडे, सांगली,कोल्हापूर, पुणे,मुंबई, सोलापूर,अक्कलकोट, परळी वैजनाथ अशा अनेक ठिकाणी लांबपल्याच्या फेऱ्या सुरू आहेत. बसस्थानकात प्रवेश केल्या पासूनच दलदल सुरु होत आहे. त्यामुळे एस.टी ,कडे जाताना अत्यंत काळजीपूर्वक चिखल अंगावर येणार नाही व पाय घसरणार नाही याची काळजी घेत चालावे लागते. अनेक प्रवाशी पाय घसरुन पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ग्रामीण भागातून शिराळा येथे येणाऱ्या शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. त्यांना ही साचलेले पाणी व चिखलातून मार्ग काढत बसस्थानका बाहेर पडावे लागत आहे. शाळेत जाताना कपडे खराब होणार नाहीत याची काळजी घावी लागते. शिवाय चिखलाने भरलेल्या पायाने एस. टी ,मध्ये चढल्याने एस.टी ही मोठ्या प्रमाणत घाण होत आहे. त्यामुळे तातडीने बसस्थानक परिसरातील खड्डे भरून घ्यावेत अशी मागणी प्रवासी, शालेय विद्यार्थी यांच्यातून होत आहे.
शिराळा आगार परिसर खड्डेमय झाल्याने आगारात खड्डे की खड्ड्यात आगार हेच कळेना. पाणी साचून आजूबाजूला चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याचा त्रास प्रवाशांना सोसावा लागत आहे. लवकरात लवकर खड्डे भरून घ्यावेत अन्यथा तालुक्यातील प्रवाशांना एकत्र करून त्या खड्यांमध्ये वृक्षारोपण करून निषेध आंदोलन करू.
मारुती रोकडे (अध्यक्ष मोरणाराज कामगार असोसिएशन शिराळा)
0 Comments