BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ड्रोनच्या घिरट्याचे प्रमाण वाढले The number of drones hovering increased

 



शिराळा,ता.१३: सप्टेंबर २०२४ : शिराळा शहरात काल रात्री शिंदे गल्ली,तळीचा कोपरा,मारीमी चौक व शिराळा बस स्थानक परिसरात  रात्री ११ वाजता ड्रोनच्या घिरट्या सूर होत्या. त्यामुळे नागरिकांनी ड्रोन पाहण्यासाठी व त्याचे चित्रीकरण करण्यासाठी गर्दी केली होती. चिखली येथे नागरिकांना ८ ड्रोन दिसले. एकंदरीत चित्र पाहता शिराळा तालुक्यात ड्रोन च्या घिरट्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. 

शिराळा शहरासह उत्तर भागात ड्रोनच्या घिरट्याचे प्रमाण वाढले असून खबालेगल्ली येथे अनेक  दिवसा पासून रात्री आठ ते दोन पर्यंत ड्रोन फिरत असल्याने  लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.दोन दिवसा पूर्वी  शिरशी,निगडी ,बेलदारवाडी , रेड येथे ही ड्रोन फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.युवकांनी त्याचे चित्रीकरण ही केले आहे. 

परवा  रात्री शिरशी येथे गावाच्या चारी दिशेला चार ड्रोन फिरत होते. त्याचे युवकांनी चित्रीकरण ही केले आहे. या पूर्वी गिरजवडे,धामवडे,कोंडाईवाडी या परिसरात फिरत होते.पाच   दिवसा पूर्वी भाटशिरगाव येथील परिसरात दोन ड्रोन फिरत असल्याचे आढळून आले होते.मंगळवार रात्री साडेअकराच्या दरम्यान पुन्हा ड्रोन दिसले.सदर ड्रोन पोलीस विभागाचा नसल्याचे सांगण्यात आले आहे.

 याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी याची माहिती दिली आहे.या गावाच्या परिसरात रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत दोन ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांना दिसले आहेत. रविवारी दि.८रोजी  दुपारी बाराच्या दरम्यान सुजयनगर येथील कुपनलिके  जवळ मार्गदर्शक हात नकाशा येथील ग्रामस्थांना आढळून आला होता. यामध्ये किती वाजता कोठून यायचे,कोणते घर फोडायचे,कोणत्या मार्गाने पळून जायचे तसेच या परिसरातील रस्ते ,घरे अडीच उल्लेख केला आहे.करमाळे येथील गावात रात्री साडे आकारा नंतर ड्रोन फिरत असल्याचे आढळून आले आहे. मंगळवार (ता.१०) रोजी शिराळा येथील प्राध्यापक कॉलनी व  भाटशिरगाव येथील अलुगडे वस्ती याठिकाणी ड्रोन फिरताना नागरिकांनी पाहिले आहे. मांगले येथे ही ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.गेले दोन दिवसापासून बेलदारवाडी , रेड परिसरात ड्रोन फिरत असल्याचे लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

 बेलदारवाडी व रेड परिसरात गेले दोन दिवस रात्रीचे तीन ड्रोन फिरत आहेत.त्यामुळे आम्ही गावात गस्त सुरु केली आहे.भीतीने गावातील लोक रात्री जागरण करत आहेत.

सुनील मस्कर रहिवाशी (बेलदारवाडी)

माणिकवाडी येथे सलग आठवडाभर ड्रोन फिरत आहेत.गणेशोत्सव सुरु असल्याने रात्री तीन वाजे पर्यंत आम्ही जागे असतो.त्यामुळे  रात्री आम्हाला तीन ड्रोन फिरत असल्याचे दिसत आहे.

तुषार शिंदे युवक (माणिकवाडी )


Post a Comment

1 Comments