BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नसून समाज व देश घडवतात Teachers not only make students but also society and nation



शिराळा,ता.५: आपण किती प्रगत झालो तरी शिक्षका शिवाय खऱ्या अर्थाने शिक्षण नाही. शिक्षक केवळ  विद्यार्थी घडवत नसून  समाज व देश घडवतात. त्यामुळे शिक्षकांना गुरुचे स्थान असल्याचे  प्रतिपादन विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख यांनी केले.

शिक्षक दिना निमित्ताने विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. तालुक्यात शाळा , महाविद्यालयात शिक्षक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कोकरूड  व नाठवडे केंद्रातील  सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. विस्तार अधिकारी बाजीराव देशमुख यांच्या संकल्पनेतून प्रत्येक वर्षी शिक्षक दिना निमित्त  शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. यावेळी  कोकरूड व नाठवडे केंद्रातील सर्व शिक्षकांचा फेटा, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन कोकरूड केंद्र शाळेचे मुख्याध्यापक संजय दिवे,प्रकाश जाधव,ग्रामीण कथाकार बाबासाहेब परीट, प्रकाश यादव ,सत्यजित यादव ,संजय कुंभार, दिलीप साळुंखे संजय गुरव, गुलाब मोहिते, केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे यांनी केले. 

विश्वास विद्यानिकेतन चिखली येथे  १० वीच्या विध्यार्थ्यानी  शिक्षकाची भूमिका बजावत  अध्यापनाचे काम केले. शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. धनश्री निघोजकर, रणवीर जाधव, श्रीराम चोरगे, अथर्व पवार, अर्णव पाटील, शिव माने ,विश्वजीत कदम, शुभम घागरे ,जयदीप पाटील या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचलन श्वेता काशिद तर  प्रास्ताविक प्रिया माने हिने केले. यावेळी प्राचार्य पी.आर.वरेकर,एस.एम. पाटील. बी. एन. पाटील, ए. एस. पाटील, सुनील पाटील,  सौ. एम. डी. कुंभार, सौ. वि.डी. शिंदे वस्तीगृह अधीक्षक जोतिर्लिंग पाटील उपस्थित होते. आभार तन्मय कुंभार याने मानले.

 जि. प.शाळा भाटशिरगाव येथे  शिक्षक दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका यांचा  सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक व  सूत्रसंचालन मुख्याध्यापक  आकाराम पाटील यांनी केले. शकुंतला निंबाळकर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, अनिल अलुगडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी  शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा कोमल देसाई, ग्रामपंचायत सदस्य गणेश पांढरे, गोरख सांगुळे,तेजश्री देसाई, सुरेखा आलुगडे, सिमा धुमाळ , शिक्षक , विधार्थी उपस्थित होते.आभार रोहित दाबोळे  यांनी  मानले.     



शिक्षक दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप

छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य दारूबंदी जन आंदोलन शिराळा तालुका अध्यक्ष पोपट बनसोडे, विश्वरत्न फाउंडेशनचे कार्यकर्ते नानासाहेब कांबळे यांच्यामार्फत शालेय साहित्याचे  वाटप पाचगणी व मानेवाडी येथे करण्यात आले 

यावेळी बाळासाहेब कांबळे शित्तुरकर, अशोक झाडे, कंरुगली गावच्या  सरपंच आम्रपाली नांगरे, ज्ञानदेव कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  सर्जेराव जाधव, अंगणवाडी सेविका सौ. शारदा माने, सौ.कविता सोनवणे, मुख्याध्यापक लक्ष्मण कांबळे,पाचगणी येथील माजी सरपंच शंकर पाटील सदस्य अशोक कांबळे, शंकर  कांबळे, राहुल कांबळे, अंगणवाडी मदतनीस अनुसया चव्हाण, मुख्याध्यापक  रवी काळबांडे,  विपिन चंद्र राऊत , नितेश हुमणे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा कांबळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments