BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

५४ वर्षा पासून अडीच फुटी मूर्तीची परंपरा जोपासणारे सुयोग मंडळSuyog Mandal, which has been cultivating the tradition of two and a half feet idol since 54 years

 

 शिराळा,ता.१२:बांबवडे (ता.शिराळा)येथे गणेशउत्सवाचा पारंपारिक व सांस्कृतिक ठेवा जपत समाज व परिसरातील आपली सामाजिक नाळ अधिक घट्ट करीत गेल्या ५४ वर्षापासून अडीच फुटी गणपतीची परंपरा कायम जोपासत सुयोग गणेश मंडळाने अडीच फूट मूर्तीची स्थापन केली आहे.पूर्वी श्रावण महिन्यात आत्माराम हिंगणे यांच्या घरी ग्रंथ वाचन करत असताना गणेश उत्सव साजरा करण्याची संकल्पना जनार्दन घोडके व बापू हिंगणे राबवली.गणेशउत्सवाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव व लोक जागर हा वारसा मनात बाळगून सुयोग गणेश मंडळाची स्थापना सन १९६९-७० मध्ये केली. त्यास आजच्या तरुणाईने तीच परंपरा जोपासली आहे.

   ५४ वर्षापासू श्रीची मूर्ती अडीच फुटाची इवलीशी गणपती मूर्ती बसवून गणेशोत्सव सोहळा साजरा होत आहे.छोटी मूर्ती असली तरी आभाळाएवढी श्रद्धा आहे.याचं गणेश मूर्तीचे ग्रामस्थांच्यावतीने माळ भागावर गणेश मंदिर उभारण्याचे काम  अंतिम टप्यात आले आहे.गेल्या कित्येक वर्षापासून गणेश मूर्तीची आगमन व विसर्जन मिरवणूक पालखीमधून केली जाते हे या मंडळाचे वेगळेपण आहे.५४ वर्षाची परंपरा अखंड ठेवत चौथ्या पिढीचे युवक तितक्याच निष्ठेने व श्रद्धाभावाने सामाजीक भान ठेवत शासकीय नियमाचे पालन करीत साधेपणाने याहीवर्षी गणेश उत्सव साजरा करत आहेत.विषेश म्हणजे सध्याच्या परिस्थीतीत इतर सार्वजनिक गणेशउत्सवांचे स्वरूप बदलले असताना या मंडळाने पारंपारिक साधेपणा सोडलेला नाही.प्रत्येक वर्षी श्रीची मूर्ती देण्यासाठी भाविक भक्तांची स्पर्धा लागली असून यंदाच्या मूर्तीची मानकरी संदीप विठ्ठल बारपटे पुढील पाच वर्षाच्या मूर्तीची नोंदणी झाली आहे.यावर्षीच्या महाप्रसादाचे अन्नदाते निवास रघुनाथ पुजारी आहेत.

Post a Comment

0 Comments