BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बँक कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू Sudden death of a bank employee

 शिराळा,ता.२७ :सागाव (ता.शिराळा) येथील युनियन बँकेत कर्मचारी  माधुरी आनंदा संकपाळ ( वय ३८)  मुळ गाव गाताडवाडी (ता. वाळवा).सध्या रा.सागाव यांचा आकस्मिक  मृत्यू  झाला. याची शिराळा पोलिसात नोंद झाली आहे. याबाबत शिराळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली.ही घटना २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडे आठ पूर्वी घडली.मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाला  नंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल .

याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल (ता.२५) रोजी माधुरी आनंदा संकपाळ ह्या  युनियन बँक  सागाव येथुन घरी येत असताना चक्कर येवुन रस्त्या कडेला  पडल्या. त्यांना  बाळासो गणपती मोहिते (रा. सागाव)  यांनी उपचारासाठी शिराळा उपजिल्हा रुग्णालयात नेले .त्यावेळी  डॉक्टरांनी तपासले असता  उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास पोलीस हवलदार सुर्यकांत कुंभार करत आहेत.

कुटुंबाचा आधार हरपला  

दहा वर्षा पूर्वी माधुरीचे पती आनंदा यांचे हि हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते हि  बँकेत कर्मचारी होते. त्यांच्या जागी अनुकंपावर माधुरी यांना नोकरी लागली.त्या सागाव येथे कार्यरत होत्या. त्या सासू इंदुताई व मुलगी आदिती सोबत सागाव येथे भाडोत्री रहात होत्या.त्यांच्या निधनाने वृद्ध इंदुताई  व मुलगी आदिती यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.आदिती सागाव येथे ९ वीत शिकत आहे. आई वडिलांच्या अकाली निधनामुळे आदितीला आता वृद्ध आजीच्या आधारावर तर मुलगा व सून गेल्याने इंदुताईला  नात आदितीच्या आधारावर वृद्धापकाळ पेलावा लागणार आहे. त्यामुळे या  दुदैवी घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.     


Post a Comment

0 Comments