BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भटक्या कुत्र्यांनी उडवली शिराळकरांची झोपwanderer dogs disturbed Shiralkar's sleep

 


शिराळा,ता.१४ :शिराळा शहरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून त्याच्या रात्रभर भुंकण्याने व ओरडण्याने रात्रीच्या लोकांच्या झोपा उडाल्या आहेत. त्यामुळे  नगरपंचायतने या मोकाट कुत्र्यांचा  बंदोबस्त करावा अशी मागणी शिराळा येथील रहिवाशी व प्रवाशी यांच्याकडून होत आहे,

शिराळा येथे प्रत्येक चौकात व गल्ली बोळात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शिराळा बस स्थानक परिसर,नगरपंचाय , इस्लामपूर-कोकरूड या मुख्यरस्त्यावर व प्रत्येक चौकात १० ते १५ कुत्र्यांचा कळप सतत फिरत आहे. अनेकवेळा मोटरसायकलच्या आडवे येत असल्याने अपघात झाले आहेत. काहींच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे  रस्त्यावरून जाणाऱ्या  महिला व लहान मुले,शालेय मुली यांच्या मनात कुत्र्यांचे कळप पाहून भीती निर्माण होत आहे. शिराळा शहरात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याला कुत्रे हे खाद्य सहज उपलब्ध होत असल्याने त्याने नागरी वस्तीत शिरकाव केला आहे. त्यामुळे लोकांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. इस्लामपूर-कोकरूड या मुख्यरस्त्यावर कुत्र्यांचे कळप फिरू लागले असल्याने चार चाकी वाहनधारक हि त्रस्त झाले आहे.त्यामुळे नगरपंचायतने ह्या भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

  १० ते १५ कुत्र्यांचा कळप आहे.नगरपंचायत व मस्जिद च्या समोर त्यांचा मोठ्या प्रमाणात वावर सुरु आहे. घराच्या पायरीवर लोकांच्या घराच्या पायरीवर बसून रात्रभर भुंकणे व ओरडणे सुरु असल्याने लोकांना झोप लागत नाही.रात्री झोपेतून उठून हाकलावी लागता.त्यामुळे नगरपंचातने त्यांना बाहेर सोडावे अथवा त्यांची नसबंदी करावी.

डी.जी.अत्तार (रहिवाशी ) 

Post a Comment

0 Comments