BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

एसटी सेवा विस्कळीत ST Service Disruption



 शिराळा,ता.४ सप्टेंबर २०२४ :महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती शिराळच्या वतीने आपल्या विविध मागण्यासाठी शिराळा आगाराच्या प्रवेशद्वारावर आज सलग दुसऱ्या दिवशी  धरणे आंदोलन करून कर्मचारी संपात सहभागी झाले. तालुक्यातील एसटी सेवा विस्कळीत झाल्याने शालेय विध्यार्थी व  प्रवाशी यांचे हाल झाले. मात्र एसटी संप असल्याने खासगी प्रवाशी वाहतूक गाड्यांची संख्या वाढली आहे.

गेले दिन दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संप असल्याने शालेय पास धारक विध्यार्थी व अर्ध्या तिकिटावर प्रवास करणाऱ्या महिला व जेष्ठ नागरिक यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लगत आहे. सोलापूर,बोरिवली ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या सकाळी सुटल्या असून इतर फेऱ्या रद्द केल्या आहेत.कालच्या तुलनेत आज सांगली,इस्लामपूर ,बांबवाडे,शेडगेवाडी मार्गावर फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. काही प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. एसटी फेऱ्या बंद असणाऱ्या मार्गावर खासगी प्रवाशी वाहतूक सुरु झाली आहे. संप सरू असल्याचे माहित झाल्याने अनेक लोकांनी प्रवास टाळला असला तरी महत्वाच्या कामासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल सुरु आहे.

आज हि कामगार संघटनेच्यावतीने आगार प्रवेशद्वारावर धरणे करण्यात आले.यावेळी  अब्दुल दिवाण,सुनील कुंभार,अशोक शेणवी,विष्णू पाटील,विजय सपकाळ,रवी भोसले,विश्वनाथ शिवजातक,शिवाजी कदम,रामचंद्र गुरव,महिंद्र पाटील,बाळू पाटील,खाजाउद्दीन मुल्ला,सागर पाटील, बाबुराव नांगरे,निवास पवार, संपत सुतार,प्रकाश कुंभार,उपस्थित होते. दरम्यान वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील यांनी कामगारांची भेट घेवून त्यांची विचार पूस करू अडी अडचणी समजून घेतल्या.शिराळा आगाराच्या ५२ पैकी ३१ एसटी बसच्या सुरु होत्या. ३८४ पैकी ९० फेऱ्या सुरु झाल्याने प्रवाशी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळाला.

मागणी केली ती चूक झाली का ?

वाहक असल्याशिवाय ११ मारुती दर्शनासाठी जाण्यास नकार देणाऱ्या ६ चालकां पैकी ५ जणांना निलंबित करण्यात आले असून एकास लाईन ऑफ केला आहे. आम्हाला चालक द्या ही मागणी करून आमच्या कर्मचाऱ्यांनी चूक केली का ?असा संतप्त सवाल कामगारांनी व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments