शिराळा,ता.१२: शिराळा येथील घरगुती गौरी गणपती विसर्जणासाठी बिरोबा डोह येथे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने निर्माल्य संकलनाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे अध्यक्ष पदमश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी,डॉ.सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचा महाराष्ट्रभर निर्माल्य संकलन उपक्रम राबविण्यात आला आहे.त्याचच एक भाग म्हणून बिरोबा डोह येथे निर्माल्य संकलन करण्यात आले.त्याचे वर्गीकरण नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी करत होते.
यावेळी प्रतिष्ठानचे आनंदराव धुमाळ,सुरेश मीरासदार,शंभूराजे भोसले,संतोष जाधव,रमेश पाटील,यांच्या सह श्री सदस्य व नगरपंचायतचे अधीक्षक प्रकाश शिंदे, आरोग्य विभाग प्रमुख लक्ष्मण मलमे, लिपिक आबाजी दिवाण, तात्यासो कांबळे,आरोग्य कर्मचारी संतोष कांबळे,गजानन सातपुते,गौतम कांबळे,नचिकेत जाधव उपस्थित होते.हे निर्माल्य एकत्रित करून त्याच्या पासून गांडूळ खत निर्मिती करण्यात येणार आहे. हे तयार होणारे गांडूळ खत प्रतिष्ठानने गोटखिंडी,इस्लामपूर,शिराळा,मांगले येथील वृक्षारोपण केलेल्या १५०० झाडांना खत घातले जाणार. शिराळा येथे प्रतिष्ठानचा आठ वर्षापासून हा उपक्रम सुरु आहे.
0 Comments