BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गणेशोत्वानिमित्त विविध खेळ व स्पर्धांचे आयोजनOrganization of various games and competitions on the occasion of Ganeshotva

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यात गणेशोत्वानिमित्त विश्वास विविध उद्योग समुहातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध खेळ, स्पर्धांचे आयोजन केले आहे. तसेच कारखान्याच्या गणेशोत्वात १० ते १६ सप्टेंबर दरम्यान चिंतामणी विजय ग्रंथाचे पारायण होणार आहे. ही माहिती कारखान्याचे संचालक व विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे अध्यक्ष विराज नाईक यांनी दिली. 

ते म्हणाले,  उद्योग समुहातील विश्वासराव नाईक कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी घरगुती गौरी-गणपती घरगुती सजावट स्पर्धा घेतली जाते. याही वर्षी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये अनुक्रमे पाच क्रमांक काढण्यात येतील. त्यासाठी अनुक्रमे स्टेनलेस्टील डिनर सेट, मिक्सर ग्राईंडर, पिण्याच्या पाण्यासाठी तांब्याची १० लिटरची टाकी, सिसम लाकडाचा चौरंग, ब्रासचे तामण व सर्व बक्षीसांसोबत प्रशस्तीपत्र देण्यात येईल. याशिवाय उत्तेजनार्थ दहा बक्षीसांसाठी प्रत्येकी प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देण्यात येतील. शिवाय जे कर्मचारी या स्पर्धेत सहभाग नोंदवतील, त्या सर्वांना प्रशस्तिपत्र देण्यात येईल. १० व ११ सप्टेंबरला कर्मचाऱ्यांनी घरी केलेल्या गौरी व गणपती सजावटीचे परिक्षण केले जाईल. 

अध्यक्ष, श्री. नाईक म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या महिलांसाठी १३ सप्टेंबरला खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये अनुक्रमे एक ते पाच क्रमांकासाठी प्रत्येकी पाच बक्षीसे देण्यात येतील. पाच पैठणी, पाच सोन्याच्या नथी, पाच चांदीचे करंडे, पाच चांदीची जोडवी, पाच आरती व सन्मानचिन्ह देण्यात येईल. यावेळी उपस्थित महिलांतून लकी डॉ काढण्यात येईल. त्यातील पाच विजेत्यांसाठी ३.५ लिटरचा प्रेशर कुकर व सन्मानचिन्हे देण्यात येईल. ‘स्पॉट गेम’ साठी २५ बक्षीसे व प्रत्येक महिलेला सहभागाबद्दल स्टेनलेस्टिलचा डबा भेट दिली जाणार आहे. 

श्री. विराज नाईक म्हणाले, १४ सप्टेंबरला ‘विश्वास’ कारखाना, विराज इंडस्ट्रिज, फत्तेसिंगराव नाईक दूध संघ व ‘विश्वास शिक्षण’ या संस्थांतील कर्मचाऱ्यांसाठी कबड्डी, व्हॉलीबॉल, रस्सीखेच या सांघीक स्पर्धा होतील. प्रत्येक स्पर्धेसाठी अनुक्रमे तीन क्रमांक काढण्यात येतील. त्यासाठी पाच, चार, तीन हजार रुपये रोख प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल. वैयक्तीक स्पर्धेमध्ये कॅरम व बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन केले असून या दोन्ही स्पर्धांसाठी अनुक्रमे दोन, दीड व एक हजार रुपये रोख व प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देण्यात येईल. 

Post a Comment

0 Comments