शिराळा,ता.७:बांबवडे (ता.शिराळा) येथे शेत जमिनीच्या वादातून आई व मुलास मारहाण केल्या प्रकरणी दोघांच्यावर शिराळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत बिरबल आनंदा श्रीराम (वय २५) यांनी शिराळा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.हि घटना शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वैभव हणमंत गावडे , हणमंत शिवाजी गावडे( रा बांबवडे) यांचा बिरबल श्रीराम यांच्या सोबत शेत जमिनीचा वाद आहे. काल शुक्रवारी (ता.६ ) रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेत जमिनीच्या वादाचा राग मनात धरून वैभवने बिरबल व त्याच्या आईस काठीने मारहाण करून शिवीगाळ केली.हणमंत याने बिरबलच्या आईस शिवीगाळ केली.पुढील तपास पोलीस हवालदार प्रदीप पाटील करत आहेत.
0 Comments