शिराळा तालुक्यात ५४२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून त्या पैकी फक्त १० गावात एक गाव एक गणपती आहे. शिराळा तालुका हा डोंगरी असल्याने दुर्गम भागात सर्व्हर व रेंज प्रॉब्लेम असल्याने बहुतंशी मंडळांना नोंदणी साठी विलंब लागत आहे. गणपती आगमनासाठी मंडळे सज्ज झाली आहेत. काल पासून काही मंडळांच्या गणपतीचे आगमन झाले आहे. अनेक मंडळांनी समाज प्रबोधनाचे देखावे उभारण्याचे काम सुरू केले आहे.
शिराळा तालुक्यात शिराळा व कोकरूड अशी दोन पोलीस ठाणे आहेत.कोकरूड अंतर्गत ३९ गावे व २९ वाड्या मध्ये १६० सार्वजनिक मंडळे आहेत. शिराळा पोलीस ठाण्या अंतर्गत ५३ गाव व वाड्या वस्त्यात ३८२ सार्वजनिक गणेशोत्सव मांडळे आहे.सर्व मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात पाऊस सुरु झाल्याने काही ठिकाणी विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे.त्यामुळे अनेकवेळा मोबाईल रेंज नसल्याने तर काही ठिकाणी सर्व्हर प्रॉब्लेम असल्याने नोंदणीसाठी अडथळा येत आहे. शिराळा तालुक्यातील मंडळांनी स्थानिक कारागीरांच्या बरोबर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून गणेश मूर्ती आणल्या आहे. अनेक मंडळांचे प्रत्येकवर्षी ठरलेले कारागीर आहेत.घरगुती गणपतीसाठी आरळा,सोनवडे,चरण,कोकरूड, गवळेवाडी, शिराळा,मांगले,सागाव, कांदे,व इतर छोट्या मोठ्या गावातून स्थानिक कुंभार व इतर कारागीर यांनी बनवलेल्या मूर्तीला प्राधान्य दिले जाते. काही ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेल्या दुकानातून मुर्त्या खरेदी केल्या जात आहेत.
या गावात उपक्रम
किनरेवाडी,कदमवाडी ,मोहरे, आंबेवाडी, अस्वलेवाडी, बेलेवाडी,उपवळे ,अंत्री खुर्द या ८ गावात एक गाव एक गणपती आहे.
0 Comments