शिराळा,ता.१६:जिथ तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे तिथे व्हा.ज्या योग्य वाटेने तुम्ही जायचं ठरवलंय त्या वाटेला नेण्यासाठी सारथी म्हणून काम मी निश्चित करेल असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.त्यामुळे या वाढ दिवसाच्या निमित्ताने शिराळ्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचे संकेत आहेत.
शिराळा येथे प.पु.स्वामी विवेकानंद सेवाश्रम संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित महा आरोग्य शिबीर उद्घाटन व स्पर्धा परीक्षा,विविध शालेय स्पर्धा ,शैक्षणिक व इतर विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्याच्या सत्कार ,शालेय मुलांना वह्या वाटप, वसंतविश्व या नियतकालिकाचे प्रकाशन प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी भगतसिंग नाईक होते. यावेळी खासदार माने म्हणाले,पृथ्वी नाईक तुमच्या डोकीवर भगवा फेटा शोभून दिसतो.त्यामुळे भविष्याचा निर्णय विचाराने घ्या. बदल घडवण्यासाठी तरुण पिढीचे खांदे सक्षम असायला हवेत. वैचारिक चळवळीचे शिवधनुष्य हाती घ्या.त्यासाठी माझे पाठबळ असेल.मुलांनी आपले ध्येय निश्चित ठेवा. कामात ध्येय ठेवणारा माणूसच यशस्वी होतो. मुलांनो पुस्तकं वाचायला शिका तुमचे आयुष्य बदलेल.
सत्यजित देशमुख म्हणाले,पृथ्वीसिंह नाईक हे सामाजिक उपक्रमात तत्पर असणारे युवा नेतृत्व आहे.ते समाज हिताचा वारसा जोपासत आहेत. भगतसिंग नाईक हे राजकीय दिशा ओळखणारे होकायंत्र आहे.त्यांचे अंदाज खरे ठरतात. त्यामुळे आता त्यांनी आता जनतेची नाडी ओळखावी.
पृथ्वीसिंग नाईक म्हणाले,माजी आमदार वसंतराव नाईक व वडील भगतसिंग नाईक यांचा आदर्श घेऊन मी सामाजिक कार्यात कार्यरत आहे.आमचा कोणाला विरोध नाही. टेंडर,रस्ता,नाले यावर राजकारण सुरु आहे.ते बदलले पहिजे.त्यासाठी आम्ही युवकांनी निर्धार बदलाचा हे आमचे घोषवाक्य केले आहे.
भगतसिंग नाईक म्हणाले,पृथ्वीच्या अंगी लहान पणापासून संगठण कौशल्य असल्याने त्याचा मित्रपरिवार मोठा आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची त्याची कायम धडपड सुरु असते.
स्वागत व प्रास्ताविक प्रा.तानाजी हवलदार यांनी केले.
यावेळी संस्थेचे सचिव विश्वप्रतापसिंह नाईक,उपाध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक,के.डी.पाटील,विश्वास कदम,अभिजित नाईक, महादेव कदम, दीपक गायकवाड,उत्तम निकम ,नम्रता नाईक,काश्मिरा नाईक.प्राचार्य राजेंद्र बसनसोडे,प्राचार्य उज्वला पाटील, उपप्राचार्य राजसिंह पाटील,भीमराव दशवंत, वैशाली कदम, अर्चना कदम उपस्थित होते. आभार एस.एम.पाटील यांनी मानले.
माझे वडील भगतसिंग नाईक यांना अनेकवेळा राजकीय दृष्ट्या दाबले आहे.नगरपंचायचे नगराध्यक्ष पद खुले झाल्या पासून काही राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. काल माझ्या कार्यलयात आलेल्या एका मित्राने माझा फोटो समाज माध्यमावर प्रसारित केला आहे.त्या फोटोत माझ्या समोर समोर घड्याळ आहे.त्या काट्यांच्या आकार धनुष्यबाण असल्यासारखा झाला आहे.त्यामुळे घड्याळाच्या काट्याचा धनुष्यबाण करण्याची ताकद आमच्यात असल्याचे मत पृथ्वीसिंह नाईक यांनी व्यक्त केल्याने शिराळा येथे राजकीय भूकंप होतील याचे संकेत त्यांनी मनोगतातून व्यक्त झाले आहेत.
0 Comments