BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गणपती बाप्पाचे जल्लोषात आगमन Ganapati Bapap's arrival in jubilation




शिराळा :विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये श्री गणेशाचे विधिवत पूजन, प्रतिष्ठापना व आरती करताना विराज नाईक व त्यांच्या पत्नी डॉ. शिमोनी नाईक

 शिराळा,ता.७  :शिराळा तालुक्यात  पावसाने उघडीप दिली असली तरी अधून मधून पडणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात सार्वजनिक व घरगुती गणपतीचे मोठ्या उत्साहत आगमन झाले.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे गणपती सवाद्य आणण्यात आले.घरगुती गणपती आणण्यासाठी कुंभारवाडे व दुकानात  अबल वृद्धांनी गर्दी केली होती. 

शिराळा,सागाव ,मांगले,कोकरूड,शेडगेवाडी,आरळा,चरण,शिरशी,येळापूर,वाकुर्डे ,बांबवडे,अंत्री, मणदूर, सोनवडे,बांबवडे, कांदे,पुनवत,फुफिरे,बिळाशी,मांगरूळ, रिळे,बिऊर ,तडवळे, भाटशिरगाव, चिखली, नाटोली या मोठ्या गावात मिरवणुकीने सार्वजनिक गणपतीचे सवाद्य आगमन झाले.  चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्यातील चिंतन मंडपात श्री गणेशाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात झाली.  कारखान्याचे संचालक व विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते विधिवत पूजन, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना व आरती करण्यात आली. यावेळी सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी आदी मंडळी, गणेशभक्त उपस्थित होते. विराज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये आज मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे आगमन व प्रतिष्ठापना करण्यात आली. विराज नाईक व त्यांच्या पत्नी डॉ. शिमोनी नाईक यांच्या हस्ते गणेशाचे विधिवत पूजन, प्रतिष्ठापना व आरती संपन्न झाली. यावेळी सरव्यवस्थापक युवराज गायकवाड यांच्यासह सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी आदी मंडळी, गणेशभक्त उपस्थित होते. गणेश उत्सवानिमित्त विद्युत रोषणाई व आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments