शिराळा:सुजयनगर- कापरी ( ता.शिराळा) करमाळे पाठोपाठ आता शिराळा शहर , भाटशिरगाव येथील परिसरात दोन ड्रोन फिरत असल्याचे आढळून आले आहे.मंगळवार रात्री साडेअकराच्या दरम्यान पुन्हा ड्रोन दिसला.सदर ड्रोन पोलीस विभागाचा नसल्याचे सांगण्यात आले आहे.मात्र यामुळे यापरिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत शिराळा पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी याची माहिती दिली आहे.या गावाच्या परिसरात रात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत दोन ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांना दिसले आहेत. रविवारी दि.८रोजी दुपारी बारा च्या दरम्यान येथील बोअर जवळ मार्गदर्शक हात नकाशा येथील ग्रामस्थांना आढळून आला होता. यामध्ये किती वाजता कोठून यायचे , कोणते घर फोडायचे , कोणत्या मार्गाने पळून जायचे तसेच या परिसरातील रस्ते , घरे अडीच उल्लेख केला आहे.रविवारी रात्री पुन्हा ड्रोन नागरिकांना दिसला.
करमाळे येथील गावात दोन दिवसा पासून रात्री साडे आकारा नंतर ड्रोन फिरत असल्याचे आढळून आले आहे.आता मंगळवार दि.१०रोजी शिराळा येथील प्रोफेसर कॉलनी तसेच भाटशिरगाव येथील अलुगडे वस्ती याठिकाणी ड्रोन फिरताना नागरिकांनी पाहिले आहे.त्यामुळे लोकांच्या भीतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे नागरिक व पोलिसांची गस्त सुरू केली आहे.
या ड्रोन बाबत नागरिकांनी कळविले असून हे ड्रोन पोलीस विभागाचे नाही.चिट्ठी व ड्रोन यामध्ये काय संबंध आहे का? याबाबत शोध घेत आहे. नागरिकांनी भिऊ नये.भाटशिरगाव , शिराळा शहरात ड्रोन दिसल्याचे नागरिकांनी काळविल्यावर तातडीने याभागात तपासणी करून गस्त वाढवली आहे. रविवार पासून नागरिक तसेच पोलिसांची गस्त यापरिसरात सुरू केली आहे.संशयास्पद काही आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
सिद्धेश्वर जंगम पोलीस निरीक्षक , शिराळा
0 Comments