शिराळा: ६ सप्टेंबर २०२४ :वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथील स्नेहल रोहित खोत (वय २३) या विवाहितेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिच्यावर डेंगीसदृश्य आजाराबद्दल उपचार सुरू होते. भारतीय सैन्यदलात सेवेत असलेल्या पती रोहित मारुती खोत (वय २९) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात माहिती दिली.
माणिकवाडी येथे काही दिवसांपासून साथ सुरु आहे. पन्नासहून अधिक लोक आजारी असून उपचार घेत आहेत. स्नेहल यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.स्नेहलचे माहेर व सासर एकाच गावात आहे. सोमवारी स्नेहल यांना ताप आला होता. त्यांनी चार दिवस स्थानिक उपचार घेतले. परंतु ताप कमी न झाल्याने दोन दिवसांपूर्वी इस्लामपूरमधील एका रुग्णालयात दाखल केले. तेथेही त्रास झाल्याने शेजारील पेठ रस्त्यावरील रुग्णालयात दाखल केले. तोवर त्या कोमात गेल्या. गुरुवारी मध्यरात्री सव्वादोनला मृत्यू झाला.
लग्नाला अवघे दीड वर्ष झाले आहे.सैन्य दलात सेवेत असलेले पती रोहित जालंधर (गुजरात) येथे कार्यरत आहेत. सोमवारी सुटीवर आले होते.पत्नीला सोबत घेऊन जाणार होते.तयारीही केली होती.रोहित आणि स्नेहल यांचा सोमवारी आलेल्या दिवशी काही क्षणांसाठी झालेली भेतील संवाद हा शेवटचा असेल याचा विचार हि त्यांच्या मनात कधी असला नसले. या दुर्दैवी घटनेने माणिकवाडी गावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments