BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

या आठ गावात सुरु आहे शैक्षणिक ,सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज बांधणी -Community building is going on in these eight villages through educational and cultural programs

 


आपल्या गावात आपल्या मंडळाची आकर्षक मूर्ती असले किंव्हा सामाजिक उपक्रम राबवत असला तर आम्हाला ९५५२५७१४९३ या नंबर वर माहिती व फोटो पाठवा.त्यास प्रसिद्धी दिली जाईल .

शिराळा,ता.९ सप्टेंबर २०२४  : सध्या सण उत्सवावर मोठ्या प्रमाणत खर्च केला जातो. कोणाचे मंडळ सरस आहे हे दाखवण्यासाठी प्रत्येकांच्या इर्षा लागलेली असते. ती इर्षा समोज प्रबोधन,सामाजिक उपक्रमात असावी. त्यातून नुकसान नव्हे फायदाच होतो. पूर्वी अशी इर्षा असायची .पण आता प्रबोधन,उपक्रमात नाही तर मोठ्यात मोठा आवाज कोणाच्या मंडळात  याची स्पर्धा सुरु आहे. त्यातून सर्वसामान्य नागरिकांना आनंद मिळण्या पेक्षा  मोठ्या प्रमाणात त्रास होऊन ध्वनी प्रदूषणात भर पडते. मनात आणले तर बदल होऊ शकतो. हा बदल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे येणे महत्वाचे आहे.हा बदल गेले १४ ते ५२  वर्षापासून पासून काही गावांनी स्वीकारला आहे. तालुक्यात आठ गावात आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून सामाजिक सलोखा राखण्यासाठी  एक गाव एक गणपती हा उपक्रम सुरु  आहे. या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. पारंपारिक वाद्याचा वापर करत असल्याने  येथे ध्वनी प्रदुषणाचा प्रश्नच येत नाही.    

किनरेवाडी येथे श्री.बाल गणेश मित्र मंडळाची १९८२ला  स्थापना झाली  असून  ४२ वर्षा पासून एक गाव एक गणपती आहे. मंडळाला मिळणाऱ्या लोकवर्गणीतून अपंगाना मदत,विधार्थ्याना  शालेय साहित्य वाटप,पहिली पासून १२ पर्यंत प्रथम तीन क्रमांक येणाऱ्या मुलांना बक्षीस,विविध स्पर्धा परीक्षेत यश मिळवणाऱ्याचा गुणगौरव,महिलांच्यासाठी हळदी कुंकू कार्यक्रम  घेवून  खेळ पैठणीचा कार्यक्रमात  पैठणी व इतर  संसारोपयोगी साहित्य  बक्षीस म्हणून दिले जाते. हळदी कुंकूसाठी  सहभागी होणाऱ्या महिलांना भेटवस्तू दिली जाते. कीर्तन भजन अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 

आंबेवाडी येथील श्री भैरवनाथ गणेश मंडळाचा  गेले ३४ वर्षापासून एक गाव एक गणपती  आहे. या गणेशोत्सव काळात मुलांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळावा म्हणून रांगोळी,संगीत खुर्ची,नृत्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. 

कदमवाडी येथे हनुमान मंदिरात गेले ४० वर्षापासून तर अस्वलेवाडी येथील सार्वजनिक गणेश मंडळाचा  गेले १५ वर्षापासून एक गाव एक गणपती आहे.या दोन्ही गावात  सकाळ-संध्याकाळ गणपती आरती केली जाते.रात्री महिलांचा झिम्मा फुगडीचा खेळ असतो. 

मोहरे येथे गेले १५  वर्षापासून  शिव शंभो गणेश मित्र मंडळाचा एक गाव एक गणपती आहे. येथे पारंपारिक वाद्याला महत्व दिले जाते.महिला व  मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी झिम्मा फुगडी, उखाणे, संगीत खुर्ची,नृत्य ,रांगोळी असा स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी गुहा हा जिवंत देखावा उभारला आहे.

अंत्री खुर्द येथील गणेश मंडळाची १९७२ ला स्थापना झाली आहे. येथे गेले ५२ वर्षे १ गाव १ गणपती आहे.पारंपारिक वाद्याच्या गजरात गणपतीचे आगमन केले जाते.येथील प्रसिद्ध असलेल्या स्वयंभू गणेश मंदिरात गणेश मूर्तीची स्थापना केली जाते.भजन,सोंगी भजन,भावगीतींचे कार्यक्रम,रक्तदान शिबीर,व्याख्यान,कीर्तन असे सामाजिक समाज प्रबोधनपर उपक्रम राबवले जातात.

उपवळे येथील एकता गणेश मंडळाची स्थापना १९८७ ला झाली आहे. गेले ३७ वर्षे एक गाव एक गणपती आहे.उत्सव काळात कीर्तन,भजन,व्याख्यान,वृक्षारोपण असे उपक्रम राबविले जातात. 

बेलेवाडी येथे सार्वजनिक गणेश मंडळाची स्थापना १९ ९८ ची  असून गेले २६ वर्षे एक गाव एक गणपती आहे.मुलांच्यासाठी संगीत खुर्ची,नृत्य असे कार्यक्रम घेतले जातात. विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या मुलांचा सत्कार केला जातो.कीर्तन,भजन अशा कार्यक्रमांचे आयोजन करून पारंपारिक वाद्याचा वापर केला जातो.


Post a Comment

0 Comments