शिराळा,ता.१०:सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत आंबा (ता.शाहुवाडी ) येथील निसर्ग पर्यटन संकुल पर्यटक,निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी अभ्यासकांकरिता खुले करण्यात आले असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र राखीव आंब्याचे वनक्षेत्रपाल अमृत शिंदे यांनी दिली.
यावेळी शिंदे म्हणाले, पर्यटन संकुलामध्ये अत्याधुनिक पद्धतीने निसर्ग माहिती केंद्र निर्माण करण्यात आलेले आहे. या माहिती केंद्रामध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव व परिसरातील जैवविविधता डिजिटल माहिती फलकांच्या माध्यमातून उलघडून दाखवण्यात आलेली आहे. वृक्ष,वन्यप्राणी, फुलपाखरे, पक्षी, कवके इ. च्या विविध प्रजाती व सौंदर्याने नटलेल्या सह्याद्री मधील विविध निसर्ग पर्यटन स्थळांची माहिती देण्यात आली आहे.संकुलामध्ये राजर्षी शाहू महाराज निसर्ग शिक्षण सभागृह हि निर्माण करण्यात आलेला आहे. यामध्ये वने व वन्यजीव संवर्धन संरक्षण आणि निसर्ग पर्यटना बाबतचे पावर पॉईंट प्रेझेंटेशन, माहितीपट, विद्यार्थी व पर्यटकांकरिता दाखविण्यात येणार आहेत, पर्यटन संकुलाचा शुभारंभ मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र राखीव, कोल्हापूरचे आर.एम.रामानुजम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपसंचालक कोयना उत्तम सावंत ,उपसंचालक चांदोली स्नेहलता पाटील,वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, नंदकुमार नलवडे, संदीप जोपळे, संग्राम गोडसे उपस्थित होते.
0 Comments