शिराळा,ता.५ :वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाण्याची पातळी वाढू लागल्याने धरण पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे तीन दरवाजे ०.२५ मीटरने उचलून सांडव्यातून २५४० व विद्युत निर्मितीतून १४०० असा ३९४० क्युसेकने पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरु असल्याने वारणा नदीची पाणीपातळी वाढू लागली आहे..
२४ तासात चांदोली ४२ तर एकूण ३६१० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सायंकाळी चार वाजता धरणाच्या पाण्याची पातळी ६२६.५५ मीटर तर पाणीसाठा ९६४.७३५ द.ल.घ.मी.होता.धरणात ३४.७ टी.एम.सी.म्हणजे ९९ .०३ टक्के पाणीसाठा झाला होता. धरणात ९२८४ कुसेसने पाण्याची आवक सुरु आहे.
0 Comments