वाटेगाव (ता.वाळवा) येथे राजतनया हाईटस येथे सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास वर्ग कार्यक्रमात बोलताना राज्याध्यक्ष दिलीप फडके सोबत दिलीप पाटील,नागनाथ स्वामी,विद्याधर कुलकर्णी ,राहुल पाटील,अनंत खोचरे व इतर
शिराळा,ता.१:सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूटमार सुरु आहे.फसव्या कर्ज योजनांना न भुलता तुम्ही फ़सू नका आणि दुसऱ्याला फसून देऊ नका.स्वाभिमानाने जगण्यासाठी तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागेल.आपल्या न्याय हक्कासाठी व होणारी फसवणूक टाळण्यासाठी जागृत व्हा असे प्रतिपादन राज्याध्यक्ष दिलीप फडके यांनी केले.
वाटेगाव (ता.वाळवा) येथे राजतनया हाईटस येथे जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यास वर्ग कार्यक्रमात बोलत होते.यावेळी राज्य संघटक दिलीप पाटील, राज्य सहसचिव व सांगली जिल्हा पालक अनंत खोचरे, जिल्हा महिला उपाध्यक्षा सोनाली पाटील,महिला संघटक श्रद्धाताई शिंदे,जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव चौगुले,वाळवा तालुकाध्यक्ष मोहन पाटील,शिराळा तालुकाध्यक्ष हंबीरराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी निवृत्त तहसीलदार माधवराव गावडे यांनी ७/१२,फेरफार, ८अ,३२ ग,वारस नोंद, बिगर शेती याबाबत असणाऱ्या नागरिकांच्या अडचणी बाबत मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निर्सन केले.
नागनाथ स्वामी म्हणाले,चांगले काम सर्वांना पटेल असे नाही.परंतु त्याकडे दुर्लक्ष करत आपले काम प्रामाणिकपणे करा.समाज कल्याणासाठी झटत रहा.एकदम होणारा बदल ठिकावू नसतो.चांगल्या कामातून सामाज्याचे नेतृत्व करा.
विद्याधर कुलकर्णी म्हणाले, जागृती करून ग्राहकाला सुशिक्षित व सक्षम करा.दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधणारा कार्यकर्ता असावा.निःस्वार्थ पणे काम करतो तो खरा कार्यकर्ता असतो. कार्यकर्त्याने कायम शिकत राहिले पाहिजे. त्याच्याकडे संयम असलाच पाहिजे.
स्वागत व प्रास्ताविक राहुल पाटील यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतराव पुदाले,सारिका पाटील,अॅड नेहा सूर्यवंशी, स्मिता भोसले, डॉ.कृष्णा जाधव,संजय पाटील,गजानन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी शंकर जाधव ,वसंत शेटके, सरोजनी कदम, मनोज मस्के,जितेंद्र गायकवाड,रवी यादव,प्रताप माळी ,सारिका पाटील,उज्वला देशमुख, अॅड अपूर्वा नलवडे, सरिता माने,सुनिता देसाई,दयानंद जाधव,अक्षय पाटील,विनायक निकम,अर्चना खटावकर उपस्थित होते.आभार अनंत खोचरे यांनी मानले.
0 Comments