BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत अतिवृष्टी Heavy rain in Chandoli



 शिराळा,ता.२५ :शिराळा तालुक्यात  गेल्या दोन दिवसापासून  पावसाचा जोर कायम असून २४ तासात चांदोली ८०  व चरण येथे ७० .३ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने दोन्ही ठिकाणी  अतिवृष्टी झाली आहे. पाथरपुंज येथे १५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होतं आहे.

चांदोलीत आज सकाळी आठ ते सायंकाळी ४ पर्यंत  आठ तासात ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.  वारणा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे.त्यामुळे १२ दिवस बंद असणारी वारणा धरणाची विद्र्युत निर्मिती पुन्हा काल पासून सुरु करण्यात आली आहे. विद्युत निर्मितीमधून १००० क्युसेकने विसर्ग वारणा नदीत सुरु असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. 

सायंकाळी चार वाजता  धरणाच्या पाण्याची पातळी ६२४.६०  मीटर तर पाणीसाठा ८९४.३५२  द.ल.घ.मी.होता. धरणात ३१.५९  टी.एम.सी.म्हणजे ९१ .८०   टक्के पाणीसाठा झाला होता. धरणात ६६४८ कुसेसने पाण्याची आवक सुरु आहे.  विद्युत निर्मितीतून १०००  क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.

मंडल  निहाय पडलेला पाऊस  मिलीमीटरमध्ये  असा :

 कोकरुड- ३३ ,शिराळा -३४ ,शिरशी - ४२.८ ,मांगले -२९.८ ,सागाव -३२.५ , चरण -७०.३   मी.मी.पाऊस पडला आहे. 

 दोन महिन्यात २१  वेळा अतिवृष्टी 

चांदोली परिसरात जुलै महिन्यात १७ वेळा तर चरण येथे ११  आणि ऑगस्ट महिन्यात चांदोलीत चार तर चरण येथे १ अशी दोन महिन्यात चांदोलीत २१ वेळा व चरण येथे १२ अतिवृष्टी झाली आहे. 


Post a Comment

0 Comments