शिराळा,ता.३:वाकुर्डे बुद्रुक योजनेला संपादित केलेल्या जमीनीचा मोबदला आद्याप ही मिळालेला नसल्याने प्रकल्पग्रत शेतकर्यांना आजच्या सुधारित दराने मोबदला मिळावा.त्याच बरोबर भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले मिळावे अशी मागणी खिरवडे -हातेगांव येथील १६० शेतकर्यानी तहसिलदार शामला खोत -पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, खिरवडे हातेगाव (ता शिराळा ) येथील २१० शेतकंर्यांच्या जमीनी वाकुर्डे बु योजनेसाठी संपादित झाल्या असून आद्याप त्या शेतकर्यांना जमीनीचा मोबदला मिळालेला नाही.त्यांना आताच्या सुधारित दराने मोबदला देण्यात यावा. प्रकल्पग्रत दाखले द्यावेत. यावेळी बबन कचरे, गोरख पाटील, महादेव पाटील,मारूती माने, मनोज माने, यांचेसह अनेक शेतकरी उपस्तित होते
0 Comments