BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

कोण आहेत विश्वास कारखान्याच्या सुवर्ण बक्षीस योजनेचे मानकरी Who are the winners of Vishwas Factory's Gold Rewards Scheme?

 शिराळा ,ता.३१:विश्वास कारखान्याने सन २०२३-२४ हंगामासाठी जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर   सुवर्ण बक्षीस योजनेत ५० टनापेक्षा जास्त ऊस पुरवठादार गटात शिराळा तालुक्यात विश्वनाथ तुकाराम पाटील (कांदे) व विलास जगन्नाथ पाटील (कापरी), शाहूवाडी तालुक्यातील सुभाष सर्जेराव पाटील (शिंपे) यांनी प्रत्येकी एक तोळा सोने जिंकले. 

चिखली (ता. शिराळा) येथील कारखाना स्थळावर  सोडत काढण्यात आली. चार गटात प्रत्येकी ३ प्रमाणे एकूण ४३६ शेतकऱ्यांमधून १२ शेतकरी भाग्यवान विजेते ठरले.त्यांना एकूण ६०  ग्रॅम (६ तोळे) सोने बक्षीस मिळाले. माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक, उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, यशवंत ग्लुकोज कारखान्याचे अध्यक्ष रणधीर नाईक, संचालक विराज नाईक व कार्यकारी संचालक अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व संचालक मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेतील गटवार इतर विजेते असे : ५०  टन वा त्यापेक्षा जास्त पुरवठादार शेतकरी संख्या शंभर होती. त्यानुसार काढलेल्या सोडतीतून वरील तीन भाग्यवान विजेते प्रत्येकी १० ग्रॅम सोन्याचे मानकरी ठरले. ४०  ते ४९  टनापर्यंत ऊस पुरवठा करणाऱ्या गटात ५१ शेतकऱ्यांचा सहभाग होता. या सोडतीतून विलास संभाजी मोर (पलूस),अप्पासो बाजीराव पाटील (तांबवे, ता. कऱ्हाड), ललिता चंद्रकांत पाटील (नांद्रे, ता. मिरज) हे शेतकरी प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याचे विजेते ठरले. ३० ते ३९  टन ऊस पुरवठा गटात ८८ शेतकऱ्यांचा सहभाग होता. सोडतीतून दीपक शामराव डवंग (वाडीचरण), भगवान नारायण ठमके (ठमकेवाडी) व ज्ञानदेव रामचंद्र पाटील (वडगाव, तिघेही ता. शाहूवाडी) हे प्रत्येकी ३ ग्रॅम सोन्याचे विजेते ठरले. २०  ते २९  टनापर्यंत ऊस पुरवठा गटात एकूण १९७ शेतकऱ्यांचा सहभाग होता. सोडतीतून महेश नथू कांबळे (तांबवे, ता. कऱ्हाड), प्रकाश बाळू गायकवाड (फुपेरे) व तानाजी गणपती पाटील (पाचुंब्री, दोघे ता. शिराळा) हे २  ग्रॅम सोन्याचे विजेते ठरले. ही सुवर्ण बक्षीस योजना राबवण्यासाठी शेती अधिकारी ए. ए. पाटील, सहाय्यक ऊस विकास अधिकारी संदीप पाटील, विवेक यादव यांच्यासह सर्व कृषी पर्यवेक्षक, गट अधिकारी व शेती विभागातील कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.

यावेळी अमरसिंह नाईक,राजेंद्रसिंग नाईक,सम्राटसिंग नाईक,सौ.सुनीतादेवी  नाईक,डॉ.शिमोनी नाईक, कार्यकारी संचालक अमोल पाटील, संचालक दिनकरराव पाटील,विश्वास कदम,सुहास पाटील कोंडीबा चौगुले उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments