शिराळा, ता. २४: कोणते ही क्षेत्र असले तरी जिद्द, चिकाटी, आणी प्रामाणिकपणे झोकून देऊन काम केल्यास यश निश्चित मिळते. त्यामुळे आपल्या कामावर निष्ठा ठेवून काम करा असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांनी केले.
फेडरेशन असोशिएशन बँक सहकारी संस्था सांगली जिल्हा यांच्या च्यावतीने भारतीय स्टेट बँक, युनियन बँक, आय.सी. आय बॅक, एच.डी.फ.सी, अॅक्सीस बँक यांच्यामार्फत वसुली व विक्री अधिकारी नामदेव दगडू कणसे (भेडसगावकर) यांनी योग्य नियोजन करून ९५% वसूली केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. त्या बद्दल आयोजित सत्कार प्रसंगी देशमुख बोलत होते.
यावेळी अनिल देशमुख, शिराळा तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, नितेश पाटील, बाळकृष्ण कुंभार, बिऊर पोलीस पाटील सीताराम पाटील उपस्थित होते. फेडरेशनच्या वतीने श्रेया रामचंद्र कुलकर्णी (क्लार्क), आदिती रामचंद्र सातपूते (कॅशिअर), रोहन करमचंद सानप (मॅनेजर), राजाराम वसंत कुलकर्णी (बॅक निरीक्षक सांगली जिल्हा, शिराळा), दिनकर आनंदराव मोहिते (सांगली पोलिस स्टेशन निरीक्षक) अनूजा नारायण पाटील (पोलीस कारकून सांगली) यांचा ही सन्मान करण्यात आला.
0 Comments