शिराळा,ता.४: शिराळा विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणाऱ्याच्या पाठीशी ठाम रहा.महायुतीतुन जरी अजितदादा पवार यांना जागा मिळाली तर तुम्हाला अपक्ष लढावे लागेल.राजकारणातील मायाळूपणा संपल्याने त्याचा परिणाम विकासावर होत आहे. व्हिजन असणारी माणसं राजकारणात असायला हवी.मी बंधावरचा असलो तरी पेरक्या आहे. त्यामुळे मी तुमच्या सोबत असल्याचा कानमंत्र आमदार सदाभाऊ खोत यांनी सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांना दिला.
शिराळा येथे विधानपरिषदेवर सदाभाऊ खोत यांच्या झालेल्या निवडी बद्दल आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते.यावेळी खोत म्हणाले,या शिराळा मतदार संघात आपल्या विचाराचे वारे आहे.वाळवा तालुक्यातील गावातून आम्ही २० हजाराचे मताधिक्य देऊ.लोकांची आपणाला साथ असल्याने एकत्रित राहिलो तर प्रस्तापिताच्या विरोधात लढण अवघड नाही.देशमुख साहेबांचा विचार आपणाला जोपासायचा आहे. ८ पैकी ७ विधानसभाआपणाला जिंकायच्या आहेत.गावागावात विकासाला निधी कमी पाडणार नाही.
यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, सदाभाऊ कृषिमंत्री असताना त्यांनी बाजार समितीचे व्यापारी धर्जीन असणारे काही निर्णय शेतकरी धार्जिन केले.साखरेला आधारभूत किंमत मिळवून दिली. या मतदार संघात विरोधकांची असणारी गावकडे तुतारी व मुंबईत घड्याळाची टिकटिक ही भूमिका बंद केली पाहिजे.
सम्राट महाडिक म्हणाले, सदाभाऊ सर्वसामान्य लोकांसाठी लढणारे नेते आहेत. वाळवा तालुक्यातील ५ जिल्हा परिषदेच्या जागा मिळाल्या .त्यामुळे जिल्हापरिषदवर भाजपचा झेंडा फडकला.आता नगरपंचायत, जिल्हापरिषद व पंचायत समितीवर झेंडा फडकवू.आता निधी आपल्या माध्यमातून मिळत असून गुणगान विरोधकांच सुरु आहे. आहे.
हणमंतराव पाटील,मंगेश तिके यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक सम्राट शिंदे यांनी केले.यावेळी संपतराव देशमुख, सी. बी. पाटील,नंदकिशोर नीलकंठ, सत्यजित कदम,रणजितसिंह नाईक,जयकर कदम,जगन्नाथ माळी, चंद्रकांत पाटील,आनंदराव पाटील,संभाजीराव नलवडे,घन:श्याम पाटील,अखिलेश पाटील, कुलदीप निकम, वैभवताई कुलकर्णी, संगीता साळुंखे, अनिता धस, शारदा घारगे, शिरशी सरपंच स्मिता भोसले उपस्थित होत्या.आभार तानाजी कुंभार यांनी मानले.
शेट्टी कणखर आणि निडर पण चाल माझी
माजी खासदार राजू शेट्टी मनाने कणखर व निडर आहे.मात्र त्यांना चाल खेळता येत नाही. त्यामुळे ते कणखर व नीडर असले तरी चाल मी खेळायचो,पण कधी कधी चांगुलपणाच ओझं होतं असा एका आंदोलनचा किस्सा सदाभाऊ यांनी सांगून आपल्या शैलीत सर्वाना खळखळून हसवले.
राजकीय रणनीती जपली
विधान परिषदेची उमेदवारी मलाच मिळणार हे एक महिना आधीच माहीत होतं.परंतु राजकीय युद्ध जिंकण्यासाठी आपल्या रक्ताच्या नात्यातील लोकांना आपले काही आराखडे कळून द्याचे नसतात हि रणनीती मी जपली.माझ्या मुलाला हि उमेदवारी बाबत सांगितले नव्हते.
आणि माझं जुळल
वरिष्ठ लोकांशी बोलून माझ विधानपरिषदचं जुळतंय का बघा म्हणून सत्यजित देशमुख व खासदार धैर्यशील माने यांच्या पाठीमागे होतो. पण त्या गड्यांनी मला दाद दिली नाही.सत्यजित देशमुख व गौरव नायकवडी यांना हि अपेक्षा होती.ते दोघे हि धैर्यशील माने यांच्या मागे होते.पण त्यांचा कार्यक्रम झाला आणि माझ जुळल असे सदाभाऊ बोलताच सर्वत्र हश्या पिकला .
0 Comments