शिराळा,ता.३१: वाटेगाव (ता.वाळवा ) येथे जागृत ग्राहकराजा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा शाखेच्या वतीने उद्या रविवारी (ता.१ ) सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत सांगली जिल्हा कार्यकर्ता अभ्यासवर्गाचे आयोजने केले असल्याची माहिती राज्य सहसचिव व सांगली जिल्हा पालक अनंत खोचरे यांनी दिली.
यावेळी खोचरे म्हणाले ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे राज्याध्यक्ष दिलीप फडके आहेत. राज्य संघटक दिलीप पाटील,राज्य सचिव प्रा.नागनाथ स्वामी,महिला संघटक शैलाताई शिळीमकर,सातारा जिल्हाध्यक्ष विद्याधर कुलकर्णी,सेवा निवृत्त तहसीलदार माधवराव गावडे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज्य कार्यकारणी सदस्या सारिका पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष वसंतराव पुदाले, जिल्हा मुख्य संघटक राहुल पाटील, जिल्हा महिला अध्यक्षा स्मिता भोसले, उपाध्यक्षा सोनाली पाटील, महिला संघटक श्रद्धाताई शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा सरचिटणीस शिवाजीराव चौगुले, वाळवा तालुकाध्यक्ष मोहन पाटील, शिराळा तालुकाध्यक्ष हंबीरराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या जिल्हा कार्यकर्ता अभ्यासवर्गास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा मुख्य संघटक राहुल पाटील यांनी केले आहे.
0 Comments