BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाईक -तावडे यांची बंद खोलीत चर्चा Naik-Tawde closed room discussion

  


शिराळा येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यात १९९५ साली युती शासनाच्या काळात विद्यमान केंद्रीय रस्ते विकास मंत्री  नितीन गडकरी यांच्या सोबत सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री म्हणून शिवाजीराव नाईक यांनी काम केले आहे.ते आपल्याकडे होते.हा संदर्भ देत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद  तावडे यांनी संवाद मेळाव्यात राष्ट्रवादीच्या शिवाजीराव नाईक यांचा आवर्जून उलेल्ख करून भाजप बरोबर नाईक यांच्या असणाऱ्या जुन्या स्नेहबांधला उजाळा दिला.ते एवढ्यावरच न थाबता  मेळावा संपताच त्यांच्या  ताफ्याने अचानक नाईक यांच्या  निवासस्थानाकडे वाकडी वाट केल्याने   भाजप व राष्ट्रवादीत  पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या खळबळ उडाली आहे. त्या ठिकाणी बंद खोलीत झालेल्या तावडे -नाईक यांच्यात कोणती राजकीय खलबत्ते झाली असावीत या बाबत  कार्यकर्त्यांच्यात  चर्चेला उधाण आले आहे. 

शिवाजीराव नाईक यांच्या माध्यमातून २०१४ साली शिराळा तालुक्यात प्रथमच  कमळ फुलले. त्यामुळे भाजपला बळ आणि हक्काचा मतदार संघ मिळाला.त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत नाईक यांना भाजप मधून पराभूत व्हावे लागले. त्यानंतर नाईक यांनी शरदचंद्र पवार व प्रदेशध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या नेतुत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला.विधानसभे पूर्वी कॉंग्रेस सोडून सत्यजित देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या  आमदार मानसिंगराव नाईक व माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्यावर  राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार पक्षाची तर सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक यांच्यावर भाजपची जबाबदारी आहे. सध्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय डावपेच सुरु असताना  भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी घरी जावून  नाईक यांची घेतलेली भेट राजकीय चर्चेचा विषय बनली आहे.नाईक -तावडे यांच्यात सुमारे अर्धातास बंद खोलीत  चर्चा ही झाली. त्या चर्चेतील राजकीय  तपशील समजू शकला नसला तरी यावेळी या  पूर्वी केलेल्या अनेक कामां बदल व जुन्या आठवणीना  उजाळा दिला गेला असला तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व दिले जात आहे.

   यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी तावडे यांचा सत्कार केला.यावेळी बाजार समितीचे उपसभापती विजय महाडिक, ॲड.नरेंद्र सूर्यवंशी ,उत्तम डांगे,उत्तम पाटील आदी उपस्थित होते. त्या नंतर सुमारे अर्धातास बंद दाराआड  चर्चा झाली.  यावेळी सत्यजित नाईक ,भाजपचे जिल्हाध्यक्ष  निशिकांत पाटील , जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष प्रतापराव पाटील ,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील यांची उपस्थिती होती.

   ही  कोणतीही राजकीय नव्हे तर मैत्रीची भेट होती. आम्ही मित्र आहोत.राजकारण नेहमी डोक्यात ठेवून चालत नाही.राजकारणा बरोबर मैत्री ही महत्वाची असून  ती जपली पाहिजे.

विनोद तावडे (भाजप चे राष्ट्रीय महामंत्री)

शिराळा दौऱ्यावर आलेल्या तावडे यांचा मला तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला होता.त्यावेळी मी शिराळा येथे असल्याने ते प्रत्यक्ष भेटीसाठी आले.राजकारणा पलीकडे आमचे जुने मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे हि राजकीय नाही तर मैत्रीची भेट आहे.

शिवाजीराव नाईक माजी राज्यमंत्री   


Post a Comment

0 Comments