शिराळा,ता.३०: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा पडझड प्रकरणी सर्व जबाबदार व्यक्तींना त्वरित निलंबित करावे. ठेकेदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज शिराळा तहसीलदार कार्यलया समोर शिवप्रेमींच्यावतीने एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रा सम्राट शिंदे म्हणाले, छत्रपती शिवराय सर्व समाजाची अस्मिता आहे. त्यांच्या नावाने निर्माण झालेल्या संघटना आज गप्प आहेत हे निर्दयी समाजाचे लक्षण आहे . महाराजांच्या सर्वच स्मारकांची काळजी घेणे आवश्यक आहे .भविष्यात अशी घटना घडून न देणे याविषयी शासनाने अंमलबजावणी करावी.
प्रतापराव पाटील म्हणाले,त्या संबंधित अभियंत्याची चौकशी करून त्याला कडक शिक्षा करावी. स्मारकांसाठी अनुभवी अभियंता यांची नेमणूक करण्यात यावी.
यावेळी शिवप्रेमीच्यावतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार शामला खोत-पाटील यांना देण्यात आले..यावेळी प्रतापराव पाटील .प्रा सम्राट शिंदे. दिग्विजय पाटील. देवेंद्र धस. बाळासाहेब पाटील. प्रवीण पाटील. सत्यजित कदम. बंटी नांगरे. अविनाश खोत .अनिल घोडे- पाटील. मारुती रोकडे. सुनील रोकडे. तुकाराम चव्हाण. संभाजी पाटील. रायसिंग पाटील. अमर पाटील. निलेश पाटील उपस्थित होते.
0 Comments