BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

अखेर कार्वे तलाव भरला Karve Lake was finally filled

 


शिराळा,ता.१ :पाटबंधारे व जलसंपदा विभागाने वाकुर्डे योजनेच्या  बंदिस्त नलिकेद्वारे करमजाई तलावातून  अतिरिक्त वाहून जाणारे पावसाचे पाणी वाळवा तालुक्यातील कार्वे तलावात सोडल्याने  तलाव पुर्ण क्षमतेने भरून पाणी सांडव्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचा वापर करून तलाव भरण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे.  कार्वे तलाव भरल्याने वाकुर्डेचे पाणी शिवपुरीकडे  सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पावसाचे  वाहून जाणारे  अतिरिक्त पाणी  विना खर्च तलावात सोडण्याची  हि  दुसरी वेळ आहे. गत वर्षी असाच प्रयोग झाला होता.मात्र पुन्हा पावसाने उघडीप दिल्याने कार्वे तलाव निम्मा भरला होता. यावर्षी मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने तलाव पुर्ण क्षमतेने भरला आहे.शिराळा तालुक्याच्या पश्चिमेला पावसाची संततधार आणि पूर्वेला रिमझीम अशी परिस्थिती आहे. सध्या आठ दिवसा पासून   वारणा काठी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र पूर्वेच्या बाजूला असणारे वाळवा तालुक्यातील शिवपुरी,वाघवाडी परिसरतील तलावामध्ये अद्याप अत्यल्प पाणीसाठा आहे. पंधरा दिवस  चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम  आहे. संततधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने मोरणा धरण,करमजाई,शिवणी,टाकवे, मानकरवाडी,रेठरे धरण हे तलाव १०० टक्के भरून पाणी सांडव्यातून बाहेर पडले आहे. अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी  वारणा पाटबंधारे विभाग व जलसंपदा  विभाग यांनी एकत्रित नियोजन करून करमजाई तलावाच्या  सांडव्यातून बाहेर पडणारे अतिरिक्त पाणी  बंदिस्त नलिकेद्वारे वाळवा तालुक्यातील कार्वे  तलावामध्ये सोडल्याने १२ दिवसात वाकुर्डेचे पाणी व पाऊस यामुळे तलाव पुर्ण क्षमतेने भरल्याने ग्रामस्थ समाधानी  आहेत.

 कार्वे परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने येथील तलावात जास्त पाणी साठा होत नाही. त्यामुळे वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून पावसाचे वाया जाणारे पाणी कार्वे तलावात सोडण्याची आमची मागणी होती.त्यासाठी आमदार मानसिंगराव नाईक,माजी आमदार शिवाजीराव नाईक,सत्यजित देशमुख ,सम्राट महाडिक यांचे सहकार्य मिळाले. तलाव भरल्याने शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून लवकर वाकुर्डेच्या पाण्याची मागणी करावी लागणार नाही.

शहाजी पाटील (सरपंच कार्वे) 

वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या बंदिस्त नलिकेद्वारे करमजाई तलावातील वाहून जाणारे अतिरिक्त पाणी कार्वे तलावात ३०.००द.ल.घ.फु. सोडले. वाकुर्डे योजनेतून सोडलेले पाणी व पाऊस यामुळे तलाव लवकर भरला.

जी.जी महाजन ( उपविभागीय अभियंता वारणा तीर कालवा)

प्रत्येक वर्षी तलाव पुर्ण क्षमतेने भरत नसल्याने आम्हाला पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण होतं होती. त्यामुळे खासगी विहिरी व टँकरचा आधार घ्यावा लागत होता.गेल्या वर्षा पासून वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडले जात असल्याने काही प्रमाणात टंचाईवर मात करणे शक्य होतं आहे.आता तलाव भरल्याने चिंता मिटली आहे.

महादेव कोरे (पोलीस पाटील,कार्वे )

आठ  वर्षात झालेला पाणी साठा व तारखा

१) २०१७(२७%) २३ ऑक्टोबर ,

२) २०१८(५४%) १० ऑक्टोबर 

३) २०१९(१००%) ५ ऑगस्ट 

४) २०२०(१००%) १४ ऑक्टोबर 

५) २०२१(१००%) २३ जुलै 

६) २०२२(१००%) १२ ऑक्टोबर 

७) २०२३(५४%)  ३ऑक्टोबर 

८)२०२४(१०० %) ३१जुलै 


Post a Comment

0 Comments