शिराळा,ता.२७ :माणसाच्या अन्न वस्त्र आणि निवारा ह्या प्रमुख गरजा आहेत.आता यामध्ये दळणवळनाच्या चांगल्या सुविधेची भर पडली आहे.गाव तिथे रस्ता हि संकल्पना ग्रामीण रुजू लागली आहे.मात्र याच दळणवळणाच्या सुविधेचा अभाव असल्याने वाकुर्डे बुद्रुक येथील पाटील कुटुंबियांना पावसाळा आला कि घरातून बाहेर कसे पडायचे याची चिंता लागून राहते.त्यांना घरातून बाहेर पाडण्यासाठी रस्ता नसल्याने गेले ३० वर्षा पासून पावसाळ्यात पाय वाटेने अर्धा किलोमीटर चिखल तुडवत अथवा मोरणा नदीच्या पाण्यातून वाट काढत दररोजच प्रवास करावा लगत आहे.त्या वस्तीवर अद्याप मोटारसायकल सुद्धा पोहचेलेली नाही. त्यामुळे संघर्षमय जीवन जगणाऱ्या पाटील कुटुंबियांवर कोणी रस्ता देता का रस्ता असे म्हणण्याची वेळ आहे.लोकप्रतिनिधीनी लक्ष घालून मोरणा नदीवर साकवाची सोय केली तरी त्यांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. किमान मोटारसायकलतरी वस्तीवर पोहचू शकेल.
वाकुर्डे बुद्रुक (ता.शिराळा) येथे वाकुर्डे ते येळापूर रस्त्याच्या दिशेला तीस वर्षांपूर्वी पासून पाटील कुटुंबियांची लोकवस्ती आहे. गावापासून सुमारे एक किमी वस्तीचे अंतर असले तरी या रस्त्यावर वरून, जाणे-येणे करणे,अत्यंत अवघड आणि धोकादायक आहे. त्यांच्या वस्तीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना बारमाही दुसऱ्यांच्या शेतातून,उभ्या पिकातून पायवाटेने ये-जा करावी लागत आहे.अथवा जवळचा मार्ग म्हणून मोरणा नदीतून ये-जा करावी लागते.उन्हाळी पाणी नसल्याने ये-जा करण्यासाठी अडचण ये नाही पण पावसाळी नदीला करमजाई तलावातून पाणी येत असल्यामुळे,पाण्याचा प्रवाह हा मोठा असतो. त्यामुळे पाण्यातून येणे -जाणे शक्य होत नाही. दुसरीकडून पायवाटे अत्यंत घनदाट झाडी वेलीतून शेताच्या बांधावरून जावे लागते.सायंकाळीच्या वेळी वन्य जीव प्राण्यांचा मोठा धोका आहे.या परिसरात बिबट्याचा वावर आहे. हे क्षेत्र बिबट्या प्रवण क्षेत्र आहे.त्यामुळे महिलांना जीव मुठीत घेवून जावे लागते. या कुटुंबियांना शाळा,दुकान,दुध घालणे,दळण कांडप ,बाजार या साठी दररोज गावात यावेच लागते. गावातील अनेक शेतकऱ्यांची याच परिसरात शेती आहे.त्यांना हि शेतीतील काम करण्यासाठी, येण्या जाण्यासाठी कायमच अडचण निर्माण होत आहे. या वस्तीवर जाण्या -येण्या पर्यायी रस्ता नसल्याने,राहिवस्यासह शेतकऱ्यांना मोठे अडचणीचे होत आहे.करमजाई तालव होण्या पूर्वी मोरणा नदीला जास्त पाणी येत नव्हते. त्यामुळे पाण्यातून ये-जा करण्यासाठी अडचण येत नव्हती,मात्र तलाव झाल्या पासून तलावातील पाणी येत असल्याने पाणी पातळी वाढून राहते. त्यामुळे तीस वर्षा पासुन या वस्ती पर्यंत रस्ता व्हावा म्हणून रहिवास्यांसह सबधित शेतकऱ्यानी अनेक वेळा निवेदन देऊन, मागणी केली आहे. ग्रामसभेत हि वारंवार आवाज उठवला गेला आहे.पण हि मागणी कोणीही गंभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे तरी संबंधितानी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी संबंधित राहिवाशी,शेकऱ्याकडुन होत आहे.
पावसाळा आला कि आमच्या अंगावर काटा उभा राहतो.वयोवृद्ध रुग्णांना भर चिखलातून उपचारासाठी खांद्यावरून नेण्याची वेळ येते.दुसऱ्यांच्या शेतातून व बांधावरून किती किती दिवस जायचं याची आम्हालाच लाज वाटते.रस्ता नसल्याने मोटरसायकल सुद्धा वस्तीकडे जातच नाही. किमान मोरणा नदीवर साकव बांधून दिला तरी आमची त्रासातून मुक्तता होईल.
शामराव पांडुरंग पाटील(रहिवासी)
0 Comments