BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

चांदोलीत सलग तीन वेळा अतिवृष्टी Heavy rains three times in a row in Chandoli

 


शिराळा,ता.२७ :चांदोली परिसरात  चार   दिवसापासून  पावसाचा जोर कायम असून २४ तासात चांदोली ८५  मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने सलग तिसऱ्या अतिवृष्टी झाली आहे.पाथरपुंज येथे आठ तासात ६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने सोमवारी  दुपारी पासून धरणाचे ०.२५ मीटरने उचललेले चार  वक्राकार दरवाजे  आज सायंकाळी ५ वाजता ०.४० मीटरने उचलून   सांडव्यातून २४३०  तर विद्युत निर्मितीतून १४३५  असा एकूण ३८६५   क्युसेक ने पाण्याचा वारणा नदीत विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणी पात्रा बाहेर पडले आहे.त्यामुळे पोट मळीतील पिके पुन्हा पाण्याखाली जाऊ लागली आहेत.

 गेले  दोन दिवसा पासून रेठरे -कोकरूड बंधारा पाण्याखाली आहे.त्यामुळे  शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील काही गावांचा जवळचा संपर्क तुटला आहे. मांगले -सावर्डे बंधारा ही पाण्याखाली गेला आहे.चांदोलीत आज सकाळी आठ ते सायंकाळी ४ पर्यंत  आठ तासात ३० मिलीमीटर तर एकूण ३४६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात आज पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

सायंकाळी चार वाजता  धरणाच्या पाण्याची पातळी ६२६ .१०  मीटर तर पाणीसाठा ९४७.९०२    द.ल.घ.मी.होता.धरणात ३३.४८ टी.एम.सी.म्हणजे ९६ .६३  टक्के पाणीसाठा झाला होता. धरणात १३३५५ कुसेसने पाण्याची आवक सुरु आहे. 

मंडल  निहाय पडलेला पाऊस  मिलीमीटरमध्ये  असा :

 कोकरुड- १५.८  ,शिराळा -२०.५  ,शिरशी - २९  ,मांगले -१७.८  ,सागाव -३५ , चरण -४५.५   मी.मी.पाऊस पडला आहे. 

 दोन महिन्यात २३  वेळा अतिवृष्टी 

चांदोली परिसरात जुलै महिन्यात १७ वेळा तर चरण येथे ११  आणि ऑगस्ट महिन्यात चांदोलीत ६   तर चरण येथे २    अशी दोन महिन्यात चांदोलीत २३   वेळा व चरण येथे १३   वेळा  अतिवृष्टी झाली आहे. 

वारणा धरणातून सद्यस्थीत सूरु असलेल्या  २४३५ क्यूसेक विसर्गात वाढ करुन सायंकाळी पाच वाजल्या पासून वक्र द्वार द्वारे २४३० क्युसेक व विद्युत जनित्र मधून १४३५  क्यूसेक असे एकुण ३८६५ विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आले आहे. तरी नदीकाठ च्या लोकांना सतर्क रहावे.

          गोरख पाटील (शाखा अभियंता,वारणावती )



Post a Comment

0 Comments