शिराळा: चरण (ता.शाहुवाडी) येथील करण युवराज पाटील (वय १९) याला मोटरसायकल चोरी प्रकरणी शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सुहास सुकुमार चौगुले रा.सांगली यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत शिराळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी ,सुहास चौगुले यांची मोटरसायकल ९ ऑगस्टला नागपंचमी दिवशी शिराळा येथून दुपारी दोन ते सहा वाजण्याच्या सुमारास चोरीस गेली होती. पोलीस अधिक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधिक्षक रितु खोखर, उपविभागिय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम, सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे ,पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे घटनेचे गांभीर्य ओळखुन गुन्हयाचा तपास करत होते. दरम्यान पोलीस नाईक अमर जाधव यांन गोपनीय बातमीदारांमार्फत आरोपी करण युवराज पाटील याने सदरचा गुन्हा केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.त्यानुसार त्यास ताब्यात व विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोल तपास केला.त्यावेळी त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुल केले.त्यामुळे त्यास अटक करुन आणखी तपास केला असता त्याने साथिदारासह आणखी गुन्हे केल्याचे कबुल केले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सिध्देश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे, पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, पोलीस हवलदार भुषण महाडीक, एस.जी.पाटील, एन.व्ही. यादव, सुभाष पाटील, माणीक पाटील, अरुण मामलेकर, पोलीस नाईक अमर जाधव, शरद पाटील, गुडवाडे (सायबर पोलीस ठाणे) यांच्या पथकाने केली.तपास पोलीस नाईक अमर जाधव करीत आहेत.
चोरीच्या पाच मोटारसायकल जप्त
पोलिसांनी चोरीतील मोटारसायकल क्रमांक एम.एच.० ८ एस.८०७७,एम.एच.१० ए.एल.९४६, एम.एच.०९,ई एक्स ४६६३ ,एम.एच.१०.सी.ई.५९०२ ,एम.एच.१० .सी,जे ४९८८ अशा ९५ हजार रुपये किमतीच्या पाच मोटरसायकल जप्त केल्या आहेत.
0 Comments