BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

लोकांचा उद्रेक होईल अशी नियम बाह्य प्रवास भाडे वाढ नको-आमदार मानसिंगराव नाईक Do not increase foreign travel fares as a rule that will cause public outcry

 


शिराळा,ता,२९:शिराळा-शाहुवाडी तालुक्यातून मुंबई व परतीचा प्रवास करणाऱ्या खासगी बस वाहतूकदरांनी गणेशोत्सव काळात  तुम्हीच तुमच्यात स्पर्धा करून लोकांचा उद्रेक होईल अशा पद्धतीचे नियम बाह्य प्रवास भाडे आकारू नये अशा सूचना आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिल्या.

शिराळा येथे तहसीलदार कार्यालयात  शिराळा व शाहूवाडी तालुक्यातून मुंबई व तेथून परतीचा प्रवासासाठी खासगी प्रवासी वातूकदारांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर  भाडेवाढ केली आहे. त्या संदर्भात  तोडगा काढण्यासाठी वाहतूकदार,अधिकारी व पदाधिकारी यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.यावेळी तहसीलदार शामला खोत-पाटील, यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक,  युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष  विराज नाईक, वाहतूक निरीक्षक नीता पाटील-सूर्यवंशी, शिराळा एस. टी. आगार प्रमुख धन्वंतरी ताटे, कोकरूड पोलिस निरीक्षक जयवंत जाधव, शिराळ्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल अतिग्रे, खासगी ट्रॅव्हसचे मालक, व्यवस्थापक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी नाईक म्हणाले, शिराळा व शाहूवाडी या डोंगराळ तालुक्यातील मोठ्या संख्येने युवक, मध्यमवर्गीय नोकरी, व्यवसाया निमित्ताने मुंबई व गावाकडे प्रवास करतात. सणासुदीला व उन्हाळी सुट्यांना हमखास ये-जा करतात.त्यावेळी ऐन सणासुदीच्या तोंडावर खासगी प्रवासी वाहतूकदार ज्यादा  दर आकारतात. याबाबत नेहमी लोकांच्या  तक्रारी येत आहेत.तुम्ही हि शेतकऱ्यांची मुले  आहे.प्रवास करणारे हे हि शेतकरी व मध्यमवर्गीय आहेत.त्यामुळे तुम्हाला चार पैसे मिळावे व प्रवाशांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार नाही याची काळजी घ्या .त्यानुसार  गणेशोत्सव काळात होणारी भाडेवाढ ही समन्वयातून करा. ज्यादा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना बसणार नाही याची काळजी घ्या. शिराळा तालुक्यातून मुंबईसाठी निम आराम अथवा शिवशाही बस सुरु करण्यासाठी शिराळा आगारा मार्फत मागणी करा.त्यासाठी आम्ही पाठपुराव करू अशी सुचना नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दर निश्चितीबाबत तहसीलदार शामला खोत-पाटील व वाहतूक निरीक्षक नीता पाटील-सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ मार्च २०१८ च्या शासन निर्णयानुसार एस. टी. प्रवासाच्या दरा पेक्षा जास्त ५० टक्के पर्यंत कमाल दराची आकारणी खासगी वाहतूकदार करू शकतात.
 दरवाढ फक्त सण काळात दोन, तीन दिवसासाठी होते. इतरवेळी प्रवासी वाहतुकीच्या मोठ्या स्पर्धेमुळे हा व्यवसाय प्रसंगी तोट्यात चालवावा लागतो. एस.टीच्या शिवशाही अथवा इतर प्रकारच्या प्रवासापेक्षा आमच्याकडून नेहमी अथवा सण काळात आकारले जाणारे दर कमी असल्याची भूमिका खासगी वाहतूकदार यांनी मांडली.
 विराज नाईक म्हणाले, निश्चित झालेले दर जाहीर करून त्याचे फलक लावावेत. म्हणजे एजंटकडून जादा दर घेण्याचे प्रकार घडणार नाहीत. 
 रणधीर नाईक, गाड्या व प्रवासी सर्वच मंडळी आपल्या तील आहेत. भाडेवाढ करून आपल्यास माणसांचे नुकसान करू नका. प्रासंगिक भाडेवाढीवर नियंत्रण हवे. 
म्हणून शिवशाही सुरु करा 
 शिराळा तालुक्यातून शिवशाही बस सुरु करावी. आम्ही प्रवाशी देवून ती बस कशी चांगली चालेले यासाठी प्रयत्न करतो अशी विनंती खासगी वाहतूकदार यांनी आमदार नाईक यांच्याकडे केली. कारण शिवशाहीच्या तिकीटा एवढे पैसे आम्हाला मिळत नाहीत.ते तिकीट पाहून लोक विना कटकट आमच्या गाडीतून प्रवास करतीलआम्हाला त्या प्रमाणे तिकटी देतील. हा  शिवशाही सुरु करण्या  मागील आमचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   
सण,उत्सव काळात बसून जाण्यासाठी जास्ती जास्त ७०० व स्लीपर कोचसाठी ९०० रुपये पर्यंत प्रवास भाडे आकारण्याचा निर्णय झाला.गाड्या थांबणाऱ्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments