BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

गव्याच्या हल्ल्यातील जखमी शेतकऱ्याचा मृत्यू

उद्या बुधवारी १४ ऑगस्टला उखळू येथे सकाळी रक्षाविसर्जन आहे. 

 शिराळा ,ता.१२ :चांदोली परिसरात असणाऱ्या  उखळू (ता.शाहुवाडी) येथे गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शंकर मारुती वडाम  (वय ६०) या शेतकऱ्याची गेले ७३ दिवस मृत्यूशी सुरु असणारी  झुंज आज भांबली आहे. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना गुरुवारी ३० मे २०२४ रोजी घडली होती. 

        याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी ,उखळु  येथील शेतकरी शंकर मारुती वडाम हे  गुरुवारी ३० मे २०२४ रोजी  सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास शेनवड म्हणुन संबोधल्या जाणाऱ्या मालकी हददीत शेती मशागतीच्या कामासाठी गेले होते. मशागतीचे काम करत असताना झुडपात लपुन बसलेल्या गव्याने शंकर वडाम यांना पाठीमागुन जोराची धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केले होते. बाजुलाच असलेले ट्रक्टर चालक संजय बाळु वडाम व संजय संतु वडाम यांनी आरडा ओरडा केल्याने गव्याने चांदोली धरणाच्या दिशेने पलायन केले होते. त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सह्याद्री व्याघ्र राखीव, आंबा येथील  अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देवून  घटनेचा पंचनामा केला होता.त्या नंतर जखमी वडाम यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटल  येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.त्यांच्या मज्जातंतूला  मार लागल्याने त्यांच्या  शरीराची हालचाल मंदावली होती. त्यामुळे त्यांच्यावर  ३० मे ते १३ जून पर्यंत १४ दिवस कृष्णा हॉस्पिटल  येथे उपचार करण्यात आले.त्या नंतर त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले होते. ६ ऑगस्टला त्यांना घरी सोडण्यात आले होते. अवघ्या पाच दिवसात आज पाहटे त्यांचे निधन झाले. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी सह्याद्री व्याघ्र राखीव, आंबा येथील अमृत शिंदे ,वनपाल सुरेश चरापले,वनरक्षक विशाल पाटील,भाग्यश्री बांगर, अंजली नवले यांनी घरी जावून भेट घेतली. त्यानंतर  मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी  त्यांच्यावर उखळू येथे मूळ गावी  वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा,दोन मुली, भाऊ,बहिण ,पुतणे ,पुतणी असा परिवार आहे.  


Post a Comment

0 Comments