शिराळा ,ता.१: वाकुर्डे बुद्रुक( ता शिराळा) येथील विनोद बबन कांबळे यास पत्नीस फोन करतो याच्या संशयावरून लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी दोघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याघटनेची फिर्याद विनोद बबन कांबळे यांनी शिराळा पोलीस ठाण्यात दिली आहे. या बाबत शिराळा पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, ३१ जुलैला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास विनोद कांबळे यास पत्नीशी फोन वर बोलतोस याचा संशयावरून नितीन संजय कांबळे व संजय शामराव कांबळे यांनी त्याच्या घरात घुसून शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली .यात त्याचा उजवा पाय मोडला आहे. पुढील तपास पोलीस हवलदार सुभाष पाटील करत आहेत.
0 Comments