BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

भाजप पक्ष प्रवेश BJP party entry

 शिराळा :विद्यमान आमदार हे दोन दगडावर पाय ठेवून (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ) खोबर तिकडे चांग भलं प्रमाणे वावरत आहे.  अशी प्रवृत्ती फार  काळ चालणार नाही. जनता त्यांना जागा दाखवेल अशी टीका भाजपा नेते, सांगली जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख यांनी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यावर केली.

   शिराळा येथे भाजपा जनसंपर्क कार्यालयात शिराळा पंचायत समिती माजी सदस्य,करुंगली येथील सर्जेराव पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यां समवेत भारतीय जनता पक्षात सत्यजित देशमुख  यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला. त्याचे स्वागत सत्यजित देशमुख यांनी केले. यावेळी  शिराळा तालुका भाजपा अध्यक्ष हणमंतराव पाटील, जेष्ठ नेते संपतराव देशमुख, के. डी. पाटील,शिवाजीराव जाधव, सम्राट शिंदे, संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष केदार नलवडे,आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक संभाजीराव  नलवडे यांनी केले.

    यावेळी सत्यजित देशमुख म्हणाले, स्व.शिवाजीराव देशमुख यांनी आपली माणसं जपली. त्यांच्या विचाराची जोपासना आपण सर्व जण करत आहोत. माझा  कार्यकर्ता हा स्वाभिमानी विचारांचा ,मायेच बळ देणारा आहे. त्यामुळे पैसा,संपत्ती पेक्षा कार्यकर्ताचे प्रेम महत्वाचे आहे. या मतदार संघात भाजपा साठी चांगले वातावरण असून लोकांचे पाठबळ मिळत आहे. आमदारांच्या दबावाला जनता आता जुमानत नाही. यावेळी बदल निश्चित आहे.

हणमंतराव पाटील म्हणाले, विरोधक लोकांच्या मध्ये बेबनाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हे दीर्घकाळ चालत नाही. विकास निधीसाठी अजित पवार  आणि मतासाठी जयंत पाटील  अशी दुटप्पी भूमिका घेवून लोकांना फसविण्याचे काम करत आहेत.

       यावेळी सेवा सोसायटी संचालक कोंडीबा पवार, माजी उपसरपंच शंकर नांगरे,माजी उपसरपंच किसन सुतार, सुरेश चव्हाण,आनंदराव सोडूलकर,संजय पाटील,भिमराव पवार, संदीप पाटील,जगन्नाथ नागरे,विठ्ठल पाटील, गणेश तुपारे आकाराम पाटील,संतोष नांगरे,अनिल ढवळे,वसंत पवार, यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला. 

यावेळी हिंदूराव बसरे,मिलिंद धर्माधिकारी,दिलीप मोरे,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रदीप पाटील, भाजपा शिराळा शहराध्यक्ष  कुलदीप निकम,किसान सेल उपाध्यक्ष सम्राट गायकवाड,तात्या धुमाळ,नारायण मोहिते,विठ्ठल पाटील उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments