BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आरळा-येसलेवाडी घाट रस्ता धोकादायक Arala-Yeslewadi ghat road is dangerous

 


शिराळा,ता.२९:आरळा-येसलेवाडी (ता.शिराळा) येथील घाटात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने आणखी दरड कोसळण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने  खबरदारीची उपाय योजना म्हणून धोकादायक ठिकाणी संरक्षण भिंती अथवा जाळ्या बसवण्याची  गरज आहे.

शिराळा तालुका हा डोंगरी तालुका आहे. त्यामुळे शिराळा पश्चिम भागात अनेक गावे व वाड्या वस्त्या डोंगर कपारीत वसल्या आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असते.त्यामुळे पावसाचे पाणी डोंगर उतारावरून खाली वाहत असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळू लागल्या आहेत.आरळा-येसलेवाडी हा घाट  रस्ता आहे. या मार्गावरून पाचगणी,मानेवाडी,गुढे,बांबरवाडी,भाडूगळेवाडी, येसलेवाडी येथील लोकांचा आरळा येथे आठवडा बाजार,वैद्यकीय सेवा,शाळा व महाविद्यालय यासाठी नेहमीच प्रवास सुरु असतो.मात्र या परिसरात सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यात या घाट  वळणाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत. काही ठिकाणी दरड कोसळून  टेकडीवर  असणाऱ्या झाडांच्या मुळ्या रिकाम्या झाल्या आहेत.त्यामुळे वाऱ्याच्या प्रवाहामुळे अथवा पावसामुळे ती  झाडे  रस्यावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरड कोसळून दगड,माती रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूचा  काही भाग खचू लागला आहे. त्यामुळे प्रवास धोकादायक  बनला आहे.त्यामुळे ज्या ठिकाणी दरड कोसळल्या आहेत अशा ठिकाणी संरक्षण भिंती अथवा जाळ्या बसवणे  गरजेचे आहे.शिवाय वळण रस्त्यावर ज्या झाडांच्या मुळ्या रिकाम्या झाल्या आहेत.त्या ठिकाणी झाडांना कठडा तयार करून त्यांना कोसळण्यापासून वाचवले पाहिजे.

 अनेक ठिकाणी दरड कोसळल्या आहेत.काही ठिकाणी रस्त्याच्या  बाजूचा काही भाग  खचला आहे.त्यामुळे अशा धोकादायक  ठिकाणी संरक्षण भिंत बांधून अथवा जाळ्या लावून खचलेल्या रस्त्याच्या बाजूची आणखी पडझड होण्या पूर्वी  दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

वसंत येसले (सेवानिवृत्त माजी सैनिक ,येसलेवाडी)      

Post a Comment

0 Comments