BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शिराळ्यात नागपंचमीचा एकच जल्लोष A single celebration of Nagpanchami in Shirala

 


शिराळा ,ता.९:येथे हजारो भाविकांच्या साक्षीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत शिराळची नागपंचमी घरोघरी नाग प्रतिमेचे पूजन करून उत्साहात साजरी करण्यात आली.कोणताही अनुचित प्रकार न घडता नागपंचमी शांततेत पार पडली.पावसाच्या सरी अंगावर झेलत बेधुंद झालेल्या तरुणाईने वाद्याच्या तालावर धरलेला ठेका यामुळे शिराळ्यात नागपंचमीचा एकच जल्लोष सुरु होता.

सकाळ पासून महिलांनी अंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.सकाळी महाजन यांच्या घरात नागप्रतिमा व मानाच्या पालखीचे विधिवत पूजन करून पालखी काढण्यात आली.त्या नंतर नाग मंडळाच्या मिरवणुकीस सुरुवात झाली.शिराळा नगरपंचायत सह ठिकाणी विविध पक्षांनी स्वागत कक्ष व कमानी उभारून नागमंडळाचे स्वागत केले.वन विभागाचे १५० अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केले होते.दहा गस्ती पथके होती.वनविभागाच्यावतीने व्हिडिओ चित्रीकरण,सीसीटीव्ही कॅमेरे तैनात होते.६५० हून अधिक वन व पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवला होता.शिराळा आगाराच्यावतीने साई मंगल कार्यालय,शिराळा-कोकरूड,बांबवडे मार्गावर विश्वासराव नाईक कॉलेज,वाकुर्डे-शिरशी मार्गावर पाडळी रोड येथे तात्पुरते बसस्थानक सुरु करून ३० व बाहेरील आगाराच्या इतर गाड्यांचे नियोजन केले होते.शिराळा-इस्लामपुर जाणारी वाहतुक शिराळा येथून कापरी,कार्वे,लाडेगाव मार्गे व इस्लामपुर येथून शिराळा 'येणारी वाहतूक पेठ नाकामार्गे एकेरी केली होती.आरोग्य विभागाची विविध ठिकाणी सात पथके तयार होती.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक,माजी मंत्री शिवाजीराव नाईक,जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख,शिराळा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक, जिल्हाध्यक्ष विराज नाईक,यशवंत ग्लुकोजचे अध्यक्ष रणधीर नाईक,माजी सरपंच देवेंद्र पाटीलमाजी नगरसेवक केदार नलवडे,युवा नेते पृथ्वीसिंह नाईक,उद्योजक मंदार उबाळे,माजी जिल्हापरिषद सदस्य महादेव कदम,यशवंत दूध संघांचे संचालक महेश पाटील,शिवाजी केन संचालक उत्तम निकम,माजी ग्रामपंचायत सदस्य अजय जाधव,माजी उपनगराध्यक्ष कितीकुमार पाटील,अखिलेश पाटील  यांनी अनेक मंडळांच्या मिरवणुकींची उद्घाटने करून नाग मंडळांचे स्वागत केले .प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसीलदार शामला खोत-पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण,पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम,पोलीस उपनिरीक्षक राहुल अतिग्रे,मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम,उपविभागीय वनाधिकारी सागर गवते,उप वनसंरक्षक निता कट्टे,सहायक वन संरक्षक डॉ.अजित साजने,कमलेश पाटील,रणजित गायकवाड,महेश झांजुर्णे,इंद्रजित निकम,विलास काळे,वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी मिरवणूकिस भेटी दिल्या.

त्यांनी खेचली गर्दी 

 मिरवणुकीच्या उद्घाटनासाठी खास आकर्षण माजी नगरसेवक केदार नलवडे यांनी सिने अभिनेत्री गौतमी पाटील,युवा नेते पृथ्विसिंग नाईक यांनी रशियातील प्रसिद्ध अभिनेत्री डॅनिका,उद्योजक मंदार उबाळे यांनी मुंबई येथील प्रसिद्धी नृत्यांगना राधा पाटील यांना निमंत्रित केले होते. त्यामुळे त्यांना पहाण्यासाठी सकाळी दहा वाजल्या पासून तरुणांईने गर्दी केली होती.


Post a Comment

0 Comments