शिराळा,ता,२७ :केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीचे व साखरेच्या आधारभूत किमतीचे धोरण किमान ५ ते ७ वर्षासाठी कायम ठेवले तर कारखानदारांना गुंतवणूकीचे योग्य नियोजन करता येईल. साखरेला आधारभूत किंमत ३८०० ते ३९०० रुपये मिळाली तर साखर कारखानदारीला चांगले दिवस येतील असे प्रतिपादन विश्वास कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
चिखली (ता.शिराळा) येथे विश्वास कारखान्याच्या सन २०२४-२५ गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदिपन समारंभ प्रसंगी बोलत होते. प्रारंभी बॉयलर कर्मचारी विलास पाटील यांनी सपत्नीक विधिवत पूजन केले.त्यानंतर आमदार मानसिंगराव नाईक व त्यांच्या पत्नी सुनीतादेवी नाईक यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न झाला.यावेळी उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.बॉयलर विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार नाईक म्हणाले,श्रावणात बॉयलर अग्नी प्रदीपन करण्याची परंपरा विश्वास कारखान्याने कायम जोपासली आहे. वारणा, मोरणा व कडवी नदीस आलेला पूर व अतिवृष्टीमुळे शेतीला सलग दोन वर्षे फटका बसत आला आहे. त्यामुळे शेतकरी अनुषंगाने साखर कारखान्यापुढे अडचणी येत आहेत.यावर्षी आलेल्या महापुरामुळे नदी बुड पिकांची, उसाची समस्या शिराळा,वाळवा व शाहुवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्भवली आहे.१५ दिवस पिके पाण्याखाली गेल्याने कुजली आहेत. मात्र या झालेल्या नुकसानी बाबत शासनाकडून अर्थिक मदतीची निश्चितता अद्याप झालेली नाही. कारखान्याची क्षमता टप्याटप्याने वाढवण्याची भूमिका आपण घेतली. कारखान्यात सध्या आधुनिकीकरण व विस्तारीकरण सुरू आहे. गाळप क्षमता ५ हजारांवरून सात हजारावर नेली असून सह वीज निर्मिती प्रकल्प १५ वरून २१ मेगावॉट, तर अर्कशाळेची क्षमता ६० वरून १०५ लाख लिटर प्रतिदिनी क्षमता निर्माण केली आहे. कारखान्याने नेहमी शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. सर्व संस्था सक्षमपणे सुरू आहेत. कारखान्याने फायदा मिळवून देणाऱ्या गोष्टीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. केंद्र शासनाचा कारखानदारीकडे बघण्याचा दृष्टीकोन अद्याप बदललेला नाही. गेल्या वर्षी इथेनॉल निर्मिती करून दिली नाही.डिस्टिलरीमध्ये आपण सव्वाशे कोटीची गुंतवणूक केली.मात्र इथेनॉलवर बंदी आणल्याने ती गुंतवणूक तशीच राहिल्याने व्याज आणी हप्ता याचा भुर्दंड बसला आहे.साखरेच्या किमती वाढीसाठी पाच -सहा वर्षे मागणी करत आहे.राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी विधानसभेत हि या बाबत आवाज उठवला आहे.विश्वास पतसंस्था चांगली चालली आहे.शेतकऱ्यांचे व कामगारांचे भविष्य अर्थिक सुबत्तेकडे नेण्यात येत आहे.
स्वागत व प्रास्ताविक संचालक विजयराव नलवडे यांनी केले.संचालक दिनकरराव पाटील,हंबीरराव पाटील,विश्वास कदम,सुरेश चव्हाण,सुरेश पाटील, बिरुदेव आमरे,बाबासो पाटील, बाळासाहेब पाटील,सुकुमार पाटील,विष्णू पाटील,अजितकुमार पाटील,सुहास घोडे-पाटील,संदीप तडाखे,तुकाराम पाटील,यशवंत दळवी, कोंडिबा चौगुले, दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, कारखाना व्यवस्थापक दीपक पाटील, सचिव सचिन पाटील, टी. एम. साळुंखे, विजय पाटील, विजयराव देशमुख, यु. जी. पाटील, सर्व खातेप्रमुख, विभाग प्रमुख, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. संचालक शिवाजी पाटील यांनी आभार मानले.
0 Comments